एकदा मोदींकडे एक फकीर आला.
त्याने मस्त गाणं गाऊन दाखवलं.
मोदींनी त्याला १ एकर जमीन देण्याची
घोषणा केली.
फकिराने अजून एक गाणं गाऊन दाखवलं.
मोदींनी त्याला १ घर दिलं.
फकिराने अजून एक गाणं गाऊन दाखवलं.
मोदींनी त्याला १ किलो सोनं दिलं.
फकीर मग घरी गेला.
२ दिवस झाले, ४ दिवस झाले, ८ दिवस
झाले, १५ दिवस झाले, महिना झाला.
पण कबूल केलेल्या बक्षिसातील काहीही
त्याला मिळाले नाही.
फकीर अस्वस्थ झाला आणि मोदींच्या
भेटीला गेला.
फकीर : मोदीजी, तुम्ही एवढी छान छान
बक्षिसे देऊ केलीत मला. पण अजूनपर्यंत हाती काहीच मिळाले नाही.
मोदीजी : अरे मित्रा, ही
देवाण-घेवाणीची कसली गोष्ट करतोस.
हे बघ, तू माझ्या कानांना
खुश करत राहिलास आणि मी तुझ्या.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.