Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

04 March 2011

Team India in danger


एक सरदार टीव्हीवर भारत वि. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट सामना पाहत होता.

त्यावेळी त्याने त्याच्या टीव्हीवर एक बॉम्ब ठेवला होता.

सरदारजीची पत्नी : अहो, टीव्हीवर बॉम्ब ठेवून काय पाहता आहात?

सरदार : जर आज इंडिया मॅच हारली तर सगळी टीमच उडवून देणारे मी बॉम्बने.

03 March 2011

सरदार अटकेत


एकदा रोड अपघातात सरदारजीला पोलीस अटक करतात.

न्यायाधीश : तुमच्या गाडीचा अपघात कसा झाला?

सरदारजी : मला काहीच माहीत नाही साहेब. मी तर झोपलेलो होतो.

जरा मदत करा


एक पती-पत्नी देवदर्शनाला जातात. संध्याकाळी एका हॉटेलवर मुक्कामाला राहतात.

दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांचं कडाक्याचं भांडण होतं.

पती पळत पळत हॉटेल मॅनेजरकडे जातो.

पती : अहो, जरा मदत करा ना...(दम खात)

मॅनेजर : बोला सर. मी काय मदत करू शकतो आपल्याला?

पती : अहो, माझं माझ्या बायकोबरोबर जोरदार भांडण झालंय. तिची खिडकीतून उडी मारून जीव द्यायची इच्छा आहे.

मॅनेजर : अहो साहेब, तुमच्या नवरा-बायकोच्या भांडणात मी तुमची काय मदत करू शकतो?

पती : अरे मूर्खा लवकर चल. त्या खिडकीची काच उघडत नाहीये.

02 March 2011

पतीचा प्रेमळ सल्ला


पत्नी : (रागाने) अहो, मी आपल्या कारच्या ड्रायव्हरला उद्यापासून कामावरून काढून टाकते आहे.

पती : का? काय झालं?   

पत्नी : कसली भयानक गाडी चालवतो तो. आज मी तिसर्‍यांदा मरता मरता वाचले.

पती : (गालातल्या गालात स्मितहास्य करीत) अगं जाऊदे ना. त्याला अजून एक संधी तर दे.

बापाला वाचवतो?


सरदारजी : काल माझे पप्पा समोरच्या विहिरीत पडले. ते काल जोरजोरात ओरडत होते, वाचवा वाचवा म्हणून.

मित्र : अरेरे, बरं मग आता त्यांची तब्येत कशी आहे?

सरदारजी : काल संध्याकाळपासून अजिबात आवाज आला नाही. म्हणजे ठीक आहे.

01 March 2011

कौन थी वो?


एकदा एक पती-पत्नी एका मोठ्या हॉटेलात संध्याकाळी जेवणासाठी जातात.

हॉटेलमध्ये जाताच आपल्या पतीस एका बाईने “हाय” असं म्हणून जाताना तिने पाहिलं.

पत्नी : अहो, ती कोण होती?

पती : तू शांत बस बघू. उगाच माझं डोकं खाऊ नकोस. मला आधीच खूप टेंशन आलंय, की आता तीसुद्धा मला हेच विचारणार आणि मी तिला काय सांगणार?

चिठ्ठी की सोडचिठ्ठी?


एक माणूस मेडिकलमध्ये जातो आणि एक बाटली विष मागतो.

केमिस्ट : माफ करा. मी ते तुम्हाला विकू शकत नाही.

यावर तो माणूस दुकानदाराला आपल्या लग्नाचं प्रमाणपत्र दाखवतो.

केमिस्ट : माफ करा हं. मला माहीत नव्हतं तुमच्याकडे चिठ्ठी (Prescription) आहे म्हणून.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...