Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

04 January 2014

हॉटेलात गेला सरदारजी

एकदा एक सरदार हॉटेलमध्ये राहायला गेला.
कारण एकच होतं की त्याला हॉटेलात राहतात म्हणजे काय ते अनुभवायचं होतं.

काऊंटरवर बिल भरल्यावर मालक एका कर्मचार्‍याला बोलावून त्याचं सामान उचलायला सांगतो.
कर्मचारी त्याचं सामान उचलून चालू लागतो आणि सरदारजी त्याच्या मागे जातो.

रूम ३ र्‍या मजल्यावर असल्याने कर्मचारी लिफ्टमध्ये जातो आणि सरदारही.

आत जाताच लिफ्टचा दरवाजा बंद होतो.


सरदारजी : अरे भाई, ये क्या है? मुझे क्या जानवर समझ रखा है आपने? मै इतनीसी छोटी जगह में नही रह सकता।

सरदारजीने केली बिल गेट्सची कानउघाडणी

सरदार Economic Times वाचत होता.

त्यात एक बातमी होती, “मायक्रोसॉफ्टने स्कायपी विकत घेतलं, तब्बल ४ कोटी डॉलरला.”


सरदारजीने लगेच बिल गेटसला फोन लावला आणि त्याला सांगितलं, “कशाला रे असले उद्योग करतोस कसलीच माहिती न घेता. किमान स्वत: बनवलेल्या याहूवर सर्च केलं असतंस तर स्कायपी मोफत डाऊनलोड करता आलं असतं.”

नॉटी सरदार


एकदा दोन सरदार हातगाडीवर दोन समोसे विकत घेतात आणि ते खाण्यासाठी KFC मध्ये जातात. मस्त AC त बसून समोसे खायचा प्लान असतो. ते समोसे बाहेर काढून खायला लागतात.

तेवढ्यात तिथला एक कर्मचारी त्यांना हटकतो, “हे बघा, तुम्ही स्वत:चे समोसे इथे खाऊ शकत नाही.”

मग काय?


सरदार आपल्याकडील समोसे अदलाबदली करतात आणि खाऊ लागतात.

03 January 2014

सरदारजीची व्यावसायिक रणनीती

एका सरदारजीने “पुत्तर दा ढाबा” टाकला.

त्यात कर्मचारी भरतीसाठी त्याने एक सूचनाफलक लावला.

“आमच्याकडे आचारी, वेटर, सफाई कर्मचारी, मदतनीस, इ. पदांसाठी भरती चालू आहे. केवळ विवाहित लोकांनीच कामासाठी अर्ज करावा.”


लोकांनी त्याला याचं कारण विचारल्यावर तो म्हणाला,त्याचं काय आहे, विवाहित लोकं त्यांना सांगितलेल्या सूचनांचं पालन करतात आणि कोणतंही काम विनातक्रार करतात. पण अविवाहित लोकं मात्र माजुरडे असतात.

02 January 2014

सरदाजीची मुलाखत

एक सरदारजी मुलाखतीसाठी एका नामांकित मोबाईल कंपनीत जातो.

त्याला बिचार्‍याला मात्र भोळ्या स्वभावाचा खूपच तोटा झाला.

त्याला पहिल्याच प्रश्नात नोकरी नाकारली गेली.

मुलाखतकार : सध्याचं सर्वप्रसिद्ध असं नेटवर्क कोणतं?


सरदारजी : कार्टून नेटवर्क.

01 January 2014

कशी बुडवाल पाणबुडी?


समजा, खूप सार्‍या सरदारांनी भरलेली (खरंतर एक असेल तरी पुरे) पाणबुडी बुडवायची असेल तर कशी बुडवाल, तीही कुठल्याही स्फोटकांविना?

सोप्पं आहे.


फक्त दरवाजावर टिकटिक करायची.


!!! नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


!!! नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!





मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...