Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

21 November 2016

मेरा भारत महान



भारतात पैसा नाही म्हणून शिक्षण सोडणारे खूप भेटतील,

पण


पैसा नाही म्हणून तंबाखू, सिगारेट, दारू सोडणारा शोधून सापडणार नाही.


20 November 2016

याददाश

एक मित्र अनेक दिवसांनी इतर मित्रांना भेटतो.

पहिला मित्र : मी आपल्या सगळ्या मित्रांना विसरलो होतो. पण एक चित्रपट पाहिला आणि सगळे आठवले.

दुसरा मित्र : कोणता?


पहिला मित्र : कमीने.


18 November 2016

याला म्हणतात हुशार विद्यार्थी


मास्तर : बंड्या, पेपर नीट धरून लिही. तो मागच्या कार्ट्याला दिसतोय बघ.


बंड्या : बघू द्या मास्तर. अख्ख्या वर्गात माझी एकट्याची नापास व्हायची इच्छा नाहीये.


17 November 2016

संताचा शोध

संता : मी एक शोध लावलाय.

बंता : कोणता?


संता : जेव्हा जेव्हा फाटक बंद होतं ना, तेव्हा तेव्हा आगगाडी जरूर येते.


16 November 2016

खरेदी-विक्री

एक बाई बाजारात भाजी आणायला गेली.

बाई : काय हो, कलिंगड केवढ्याला दिलीत?

विक्रेता : ३० ला दोन.

बाई : थोडं कमी कराना.


विक्रेता : ठीक आहे. ३० ला एक घ्या.


14 November 2016

असाही उपचार

एक माणूस दवाखान्यात उपचारासाठी गेला.


डॉक्टर : तुम्हाला विश्रांतीची खूप गरज आहे. एक झोपेची गोळी लिहून देतोय. बायकोला द्या.


13 November 2016

बापरे...!!!

एकदा एक बाई एका ज्योतिषाकडे गेली.

ज्योतिषी : बोला, कुणाचं भविष्य जाणून घ्यायचं आहे? तुमच्या नवऱ्याच सांगू?


बाई : नको. त्यांचं भविष्य तर माझ्या हातात आहे. फारतर त्यांचा भूतकाळ सांगा.


मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...