पुणे रेल्वे स्टेशनवर एक तरुण सोलापूरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढला.
ज्या डब्यात तो चढला, त्या डब्यात खूप गर्दी होती. म्हणून याने शक्कल लढवली. मोठ्या-मोठयाने तो साप साप म्हणून ओरडू लागला.
डब्यातले सगळे लोक भीतीने खाली उतरले. हा मात्र मोठ्या रुबाबात डब्यातल्या एका सीटवर जाऊन तोंडावर पेपर ठेवून झोपी गेला.
जवळपास दीड-दोन तासाने त्याला जाग आली.
तसा तो उठला आणि शेजारी उभ्या असलेल्या माणसाला त्याने विचारलं, "कोणतं स्टेशन आलं हो ?"
माणूस म्हणाला, "पुणे स्टेशन."
"काय? पुणे स्टेशन?", तो तरुण गोधळून म्हणाला.
"होय, या डब्यात साप होता म्हणून गाडी हा डबा इथेच सोडून सोलापूरला गेली," तो माणूस म्हणाला.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.