२००९ साली सोनियांनी काय हुशारी केली बघा.
बहुमत मिळाल्यावर अनेकजण त्यांच्या
विरोधात असूनही पुढारपणा करीत स्वत:ला पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून सांगू
लागले.
मग सोनियांनी सगळ्यांना एका विमानात घातलं आणि म्हणाल्या, “चला
आकाशातून आपली संसद कशी दिसते बघूया.”
विमान हवेत उंच जाताच त्यात काहीतरी
बिघाड झाला. एक दरवाजा उघडला जाऊन सगळे प्रवासी त्यातून बाहेर फेकले जाऊ लागले. पण
या सगळ्या गोंधळात सुदैवाने सर्वांच्या हातात एक दोरखंड लागल्याने सगळे त्याला पकडून
हवेत लटकू लागले.
एवढ्यात पायलटने घोषणा केली,
“विमानाचा तोल बिघडतोय. पटकन कुणीतरी
एकाने दोर सोडा.”
या संधीचा फायदा घेऊन सोनिया
म्हणल्या, “ठीक है. मै मेरी अंतरात्मा का आवाज सुनकर यह त्याग
करने को तैयार हू. तालिया...”
मग काय?
सगळ्यांनी खुश होऊन टाळ्या
वाजवल्या आणि अशाप्रकारे त्यांनी आपल्या अंतर्गत विरोधकांना “हात” दाखवला आणि तेव्हापासून
आजपर्यंत जनतेला.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.