दोन जिगरी दोस्त असतात.
एकजण असतो खूप श्रीमंत
तर दूसरा असतो गरीब, आम आदमी.
श्रीमंत मित्राकडे असते, बीएमडब्ल्यू; तर गरीब
मित्राकडे असते नॅनो.
एकदा नॅनो रस्त्यात बंद
पडते आणि तो गरीब मित्र श्रीमंत मित्राला मदतीसाठी बोलवतो.
श्रीमंत मित्र बीएमडब्ल्यू
घेऊन येतो. तिला मागे नॅनो बांधतो.
तो आपल्या गरीब मित्राला
नॅनोमध्ये बसवतो आणि म्हणतो, “जर तुला वाटलं की मी जोरात गाडी चालवतोय, तर डिप्पर
दे; म्हणजे मी वेग कमी करीन.”
थोडं अंतर दूर जातात तेवढ्यात
बीएमडब्ल्यूच्या बाजूने एक ऑडी जोरात वेगाने पुढे जाते.
मग बीएमडब्ल्यूवाला उचकतो
आणि हे विसरून जातो की त्याने मागे नॅनो जोडलेली आहे.
मग काय, बीएमडब्ल्यू
आणि ऑडीमध्ये जबरदस्त रेस चालू होते.
वेग १५० च्या वर जातो
आणि ते पोलिसांचे बॅरीकेडस तोडून जातात.
तिथला एक पोलिस शिपाई
घटनेची माहिती देण्यासाठी त्वरित आपल्या वरिष्ठांना फोन लावतो.
शिपाई : साहेब, आत्ताच
बीएमडब्ल्यू आणि ऑडी या गाड्यांमध्ये रेस चालू असताना त्या आपले बॅरीकेडस तोडून गेलेत.
पण ते सोडा सर. हैराण करणारी गोष्ट ही आहे की, या दोन
गाड्यांची रेस चालू असताना एक नॅनोवाला मागून ओवरटेकिंगसाठी नुसते डिप्परवर डिप्पर
मारत होता.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.