Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

02 May 2011

जास्त ज्ञान शिकवू नका


संता एके दिवशी दोन चपात्या खात बसलेला असतो.

बंता : का र, तू एकाच वेळी दोन चपात्या एकसाथ का खात आहेस?

संता : कारण, डॉक्टर म्हणाले की रोज दोन चपात्या खात जा.

हजरजबाबी


एक सरकारी कर्मचारी आपल्या टेबलावर माशा मारत बसलेला असतो.

वरिष्ठ अधिकारी त्याचवेळी तेथे येतात.

अधिकारी : काय हो, काय चाललंय?

कर्मचारी : माशा मारतोय.

अधिकारी : अच्छा ! किती मारल्यात?

कर्मचारी : ८ ! ५ नर आणि ३ माद्या.

अधिकारी : (आश्चर्यचकित होऊन) तुम्हाला कसं कळलं?

कर्मचारी : कारण, ५ बियरच्या बाटलीवर बसल्या होत्या. तर ३ त्या फोनवर बसल्या होत्या.

Hellotune

बंता : अरे तुझा मोबाइल बंद का आहे? खूप वेळा प्रयत्न केला पण तो बंद आहे म्हणून सांगतीये पलिकडची बाई.

संता : अरे गधड्या, ती माझी हॅलोट्यून आहे.



01 May 2011

मी होतो म्हणून


एकदा जोराचं वादळ येतं. एक मच्छर त्या वादळाने उडून एका वार्‍याने गदागदा हलत असलेल्या नारळाच्या झाडाला चिकटतो.

वादळ संपतं. 

मच्छर मग घाम पुसत बाजूला येतो, आणि झाडाला उद्देशून म्हणतो,बघ, मी होतो म्हणून तर तू वाचलास.

बायकोसाठी खरेदी


नवरा : अहो, मला माझ्या बायकोसाठी चप्पल हवी आहे.

दुकानदार : ठीक आहे. नंबर (साइज) सांगा.

नवरा : अं, साइज तर माहीत नाही बुवा. पण माझ्या पाठीवर तिच्या चपलेचा ठसा आहे.

How to propose?


एकदा काय होतं, की एक उंदीर मांजरीच्या प्रेमात पडतो.

पण

मांजरीला Propose करायचं म्हणजे आली का पंचाईत?

आधीच ती मांजर आणि त्यात त्याचा जीव तो काय?

तरीपण उंदीर मोठ्या धाडसाने तिच्याकडे जातो.

उंदीर तिला असा Propose करतो...

ओ बिल्लो राणी, कहो तो अभी जान दे दू।
जान दे दू, मै अपना इमान दे दू।
ओ बिल्लो राणी, कहो तो अभी जान दे दू।

शिका यांच्याकडून काहीतरी

इंटरनेटवरुन साभार.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...