Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

30 September 2010

बी.पी.


नाडकर्णी : अहो कुलकर्णी, मला डॉक्टर काल सांगत होते, की माझं बी.पी. वाढलय. हे बी.पी. म्हणजे काय हो ?




कुलकर्णी : बावळटपणा !

आठवण



“बाबा, बाबा, आज संध्याकाळी सूर्यास्त पहायला आपल्याला डोंगरावर जायचे आहे ना, मग लवकर या.” बंड्याने आपल्या वडिलांना आठवण करून दिली.


तेव्हा बंड्याचे बाबा त्याला म्हणाले, “अरे बाळा, आज मला लवकर यायला जमणार नाही, उद्या सकाळी आपण नक्की जाऊयात.”

कॅलेंडर


बंड्या : काका, मला एक कॅलेंडर द्या ना.
दुकानदार : कोणतं कॅलेंडर हवय तुला ?
बंड्या : ज्या कॅलेंडरमध्ये सगळ्यात जास्त सुट्ट्या असतील ना, असं.
     

करिअर



सुरेश : अरे जयदीप, तु मोठा झाल्यावर काय बनणार ?

जयदीप : मी जनावरांचा डॉक्टर बनणार.

सुरेश : अरे, पण तुला जनावरांचाच डॉक्टर का बनायचं आहे ?

जयदीप : कारण, जनावरं उलट फिरून तक्रार करत नाहीत.

 

प्रेमाची किंमत


लैला ही मजनूच्या प्रेमात आकंठ बुडाली होती.
पण मजनू मात्र व्यवहारी होता.
त्याच्या या व्यवहारीपणामुळेच दोघांचे भांडण झाले.

लैला रडत रडत म्हणाली, प्रेम कधीच विक घेता येत नाही.

मजनू : हो, पण तरीही ते महागात पडू शकतं.

प्रेम

लैला : तुझे माझ्यावर किती प्रेम आहे रे ?

मजनू : शाहजानचे मुमताजवर होते ना, तितके.

लैला : मग तु माझ्यासाठी ताजमहाल कधी बांधशील ?

मजनू : हो, प्लॉट घेऊन ठेवला आहे, आता तुझ्या मरण्याचीच वाट पाहतोय.

28 September 2010

चोरी

शेजारी : अहो भटजी महोदय, तुमच्याकडे काल चोरी झाली. तरी तुम्ही पोलिसांकडे तक्रार का नाही केलीत. तुम्ही नेमकी कशाची वाट पाहत आहात ?


भटजी : मुहूर्ताची.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...