Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

09 July 2011

लायकी बघून माग

भिकारी : साहेब, १ रुपया द्या ना. फक्त १ च रुपया.

साहेब : ए, माझी लायकी बघून तरी माग. १ रुपया काय मागतोस sss

भिकारी : १० रुपये द्या साहेब. १० रुपये द्या.

साहेब : अबे, जरा तुझी लायकी बघून माग की.

08 July 2011

मृत्यूदर

शिक्षक : आपल्या देशात मृत्यूदर काय आहे?

बंड्या : १०० टक्के.

शिक्षक : १०० टक्के??? कसा काय?

बंड्या : आपल्या देशात जो जन्माला येतो, तो प्रत्येकजण मरतोच ना.



इंधन वाचवा

एक माणूस मरतो. त्याला तिरडीवर ठेवून ती तिरडी एका वाहनात ठेवली जाते.

आता अंत्यसंस्कारांसाठी हे वाहन स्मशानभूमीपर्यंत चालू करून नेण्याऐवजी लोक ढकलत ढकलत नेट असतात.

रस्त्याने जाणारी एक व्यक्ती त्यांना याचं कारण विचारते.

तर एकजण म्हणतो, "जो मेला आहे ना, त्याची अंतिम इच्छा होती की कुठल्याही परिस्थितीत पेट्रोल वाचवा."


हरी ओम, हरी ओम !!!

भारतातून एक पंडित अमेरिकेत जातो.

तिथे त्याला हृदयविकाराचा झटका येतो.

नागरिक पटकन अम्ब्युलंस बोलावतात आणि त्याला त्यात घालतात.

पंडितजी मात्र देवावर श्रद्धा ठेवून ओरडू लागतात, "हरी ओम, हरी ओम !!!"

अम्ब्युलंसमधला कंपाऊंडर मात्र त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी त्यांच्या घरी घेऊन जातो.

पंडितजी : अरे मूर्खांनो, मला इथे हृदयविकाराचा झटका आला आहे आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये नेण्याचं सोडून घरी का आणलंत???

कंपाऊंडर : तुम्हीच तर ओरडत होतात, "Hurry Home, Hurry Home."



07 July 2011

जो डर गया, वो मर गया

दोन व्यक्ती असतात.

एकाचं नाव असतं जो आणि दुसर्‍याचं असतं वो.

एकदा जो आणि वो एका जंगलात फिरायला जातात. तिथे त्यांना एक साप दिसतो.

जो सापाला बघून खूप घाबरतो पण तेवढ्यात साप वोला चावतो आणि वो मरतो.

आता मला सांगा, वो कसा काय मेला???

तुम्ही म्हणाल की साप चावून...पण कसं शक्य आहे??? (हा PJ आहे.)

तो मेला कारण : जो डर गया, वो मर गया.



हुंडा पाहिजे

मुलगा : अगं आपलं लग्न झाल्यावर तुझा बाप हुंड्यात मला कार देईन ना?

मुलगी : तुला कशाला हवी आहे कार? देवाने दोन पाय कशाला दिलेत?

मुलगा : ब्रेक आणि एक्सीलरेटर दाबायला.




खरा आंधळा भिकारी कसा ओळखावा


भिकारी : हे सुंदरी, या आंधळ्याला १ रुपया दे ना. उपाशी आहे दोन दिवसांपासून.


नवरा : देऊन टाक गं.

बायको : असं कसं देऊन टाक? पैसे काय झाडाला लागतात? आणि हे लोकं फक्त आंधळा असल्याची नाटकं करतात, माहितीये?

नवरा : नाही गं, ज्याअर्थी तो तुला सुंदरी म्हणाला; त्याअर्थी तो नक्कीच आंधळा आहे. देऊन टाक.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...