Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

24 June 2012

Free चा जमाना की मुलींचा...


एक मुलगी शाम्पु आणायला दुकानात जाते.
दुकानदार शाम्पुची बाटली देतो.

ती मुलगी दुकानदाराला पैसे देते आणि म्हणते,यावर हे जे फ्री आहे ना ते पण द्या ना.

दुकानदार : यावर काहीही फ्री नाहीये.

मुलगी : खोटं बोलू नका. यावर एवढं मोठ्ठ्या अक्षरात लिहिलंय,Dandruff FREE.

23 June 2012

घुट घुट के या एक दम मे?



एका पुणेकराकडे लग्न असतं. गावाहून नातेवाईक आलेले असतात.
लग्न लागतं. सगळे आपापल्या घरी निघून जातात.
काही मोजकेच पाहुणे राहिलेले असतात. ते मंडपात झोपलेले असतात.

एका पुणेरी आजोबांच्या बाजूला एक जाडजूड पोरगा (ठोकळा) झोपलेला असतो.
त्याचा एक पाय सारखा आजोबांच्या अंगावर पडत असतो. आजोबा त्याचा पाय बाजूला ढकलून ढकलून वैतागलेले असतात.

मग आजोबा बाजूला पडलेली काठी उचलून तिचा आकडा त्याच्या मानगुटीत अडकवून ओढून त्याला उठवतात. तो जाड्या वैतागून उठतो आणि विचारतो, “काय पाहिजे?”

आजोबा : बाळा मला सांग, श्वास थांबून तडफडून तडफडून मरणं चांगलं की एका क्षणात जीव जाणं चांगलं?

पोरगा एवढासा प्रश्न विचारण्यासाठी झोपेतून उठवलं म्हणून वैतागतो. पण कुठे ह्या म्हातार्‍याच्या नादी लागायचं म्हणून बोलून टाकतो, “एकदम मरणं चांगलं.”

आजोबा : अरे ठोकळ्या, मग तुझा नुसता एक पाय माझ्या अंगावर टाकून का झोपतोस? दोन्ही पण पाय माझ्या अंगावर टाक. अन तेवढ्याने पण माझा जीव नाही गेला तर माझ्या उरावर ब्रेक डान्स कर की वरातीत करत होतास तसा...

21 June 2012

स्मार्ट विद्यार्थी



शिक्षक : जो माझ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देईल, तो विद्यार्थी शाळेतून लवकर घरी जाऊ शकतो.

हे ऐकताच एक विद्यार्थी आपलं दप्तर खिडकीतून बाहेर टाकून देतो.

शिक्षक : ते दप्तर कुणी टाकलं रे बाहेर?

विद्यार्थी : सर, मी टाकलं. मी आता जाऊ घरी?


20 June 2012

बाप्पाचा पप्पा...


एक बेवडा फुल्ल तर्राट होऊन रोज सकाळी शंकराच्या देवळात पाया पडून आपल्या पुढच्या कार्यक्रमाला जात असतो.

एक दिवस देवळातला पुजारी शंकराच्या मूर्तीच्या जागी गणपतीची मूर्ती ठेवतो.

बेवडा नेहमीप्रमाणे सकाळी शंकराच्या दर्शनाला येतो.

शंकराच्या जागी गणपतीला पाहून म्हणतो,ए छोट्या, तुझ्या पप्पाच्या आशीर्वादानं आपलं कसं मस्त चाललंय. पप्पाला म्हणावं काका येऊन गेले आज. आठवणीनं सांग बरं.

16 June 2012

दहावीचा निकाल


एक नेता आपल्या मुलाचा दहावीचा निकाल लागल्यावर त्याला घेऊन शाळेत गेला.

निकाल हातात येताच त्याचा मुलगा नापास झाल्याचे त्याला कळले.
तरीपण तो मिठाईच्या दुकानात गेला, पेढे आणले आणि सर्व शिक्षकांना पेढे वाटले.

मुख्याध्यापक : अहो, तुमचा मुलगा तर नापास झालाय ना? मग पेढे कसले वाटता?

पुढारी : हो. पण वर्गातील ६० मुलांपैकी ५० मुले नापास झाली म्हणजे बहुमत तर माझ्या मुलाच्या बाजूने आहे ना.

15 June 2012

कंजूशीला हद्दच नाही...


एक कंजूस मारवाडी आपल्या हातावर ब्लेडने कापून घेत होता.

त्याची बायको घाबरली आणि तिने विचारले, “अहो, काय झालं? का कापून घेताय स्वत:ला?

मारवाडी : काही नाही गं. जरा डेटॉल (Detol) सांडलं होतं. आता ते असं कसं वाया जाऊ द्यायचं म्हणून थोडंस कापतोय.

ओसामा “बोलबच्चन” आणि अमिताभ बच्चन


ओसामा : आप कैसे हो?

अमिताभ : बस “कभी खुशी कभी गम” और आप?

ओसामा : बस “कभी गोला कभी बम.”

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...