Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

29 December 2013

इनकी, ऊनकी और आपकी राजनीती



नरेंद्र मोदी : हमारे सरकार आने पर गुजरात मे हमने सिंचन का ऐसा  काम  किया, की वहा पर जलस्तर हरसाल बढा है|

शीला दीक्षित : तो उसमे क्या बडा तीर मारनेवाली बात है? दिल्ली मे जबसे हमारी सरकार आई है, हमने नदीयो का ऐसा काम तमाम किया है की हरसाल बारीश मे जलस्तर जमीन के बाहर आ जाता है। हर घर पानी मे डुबा होता है।

अरविंद केजरीवाल : हमारी सरकार आएगी तो हम हर घर के सामने ७०० लीटर प्रतिदिन X ३० दिन X १२ महीने = २,५२,००० लिटर क्षमता की टंकी रख देंगे, जिससे बाढ आने के बाद वो टंकी भरेगी, और हर परिवार को अगले एक साल रोज ७०० लिटर मुफ्त पानी मिलेगा।


(मी आशा करतो की, नरेंद्र मोदी खरं बोलत आहेत. शीला दीक्षित तर खरोखरच खरं बोलत आहेत, म्हणूनच त्यांची ही अवस्था आहे, आणि अरविंद केजरीवालांनी असं भन्नाट काहीतरी IIT expertise वापरू नये.)


29 September 2013

डील - written/non-written

मी माझ्या प्रतिस्पर्ध्यांशी नेहमी एक समझोता करतो, तो म्हणजे...


ते माझ्याबद्दल खोटं बोलणं आणि अफवा पसरवणं थांबवत नाहीत,
तोपर्यंत मी त्यांच्याबद्दल खरं बोलणं थांबवणार नाही.”

करियर मार्गदर्शन – वटहुकुम


कलंकित मंत्र्यांना वाचवण्यासाठी कोंग्रेस आणि मित्रपक्षांनी जीवाचा आटापिटा करून वटहुकुम काढल्यावर केवळ राजकारणातच नव्हे तर सामान्य माणसाच्याही जीवनात उत्कर्ष घडवण्याचा यशस्वी प्रयत्न होईल, तो कसा......?

मुलगा : बाबा, मला संघटित गुन्हेगारीत करियर करायचंय.

बाबा : अरे वा ! खाजगी क्षेत्रात की सरकारी?

मुलगा : अं...


बाबा : हे बघ, तू विचार जरूर कर. पण माझं व्यक्तीगत म्हणणं असं आहे, की तू हे करियर सरकारी क्षेत्रात करावंस. कारण काहीही झालं तरी ते कधीच तुरुंगात जात नाहीत.

15 September 2013

हॉटेलच्या शोधात...

एक पुणेकर एकदा सहलीसाठी कुलु-मनालीला जातो.
तिथे त्याला जाम भूक लागते.

जवळच दोन जाडजूड-अगडबंब व्यक्ती उभ्या असतात. तेही पर्यटकच असतात.

पुणेकर : अहो, मला खूप भूक लागलीये. इथे कुठे चांगलं हॉटेल आहे का?

एक जाड्या : काही माहिती नाही बुवा. आम्हीही इथे नवीनच आहोत.

पुणेकर : काही हरकत नाही. आपण एकत्रच फिरूया.

दूसरा जाड्या : , काय संबंध? आपली ना ओळख ना पाळख?

पुणेकर : तसं नाही ओ. तुमच्या शरीरयष्टीकडे बघून मला अंदाज आलाय की थोडा वेळ तुमच्याबरोबर राहिलो ना तर मला हॉटेल नक्की सापडेल. 

03 September 2013

दारू की बोतल

एक सरदार दारू घ्यायला वाईन शॉपमध्ये जातो.

तो ऑर्डर देणार तेवढ्यात बाजूचा एकजण ऑर्डर देतो,जॉनी वॉकर, सिंगल.

मग दूसरा एकजण म्हणतो,पीटर स्कॉच, सिंगल.


आता सरदार ऑर्डर देतो,नवज्योतसिंग, मॅरीड.

18 August 2013

सरदारजी बसला M.P.S.C. च्या परीक्षेला

सरदारजी M.P.S.C. च्या परीक्षेला बसला होता.

परीक्षेच्या दिवशी परीक्षागृहात सर्व परीक्षार्थिंना उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका वाटण्यात आल्या.

सरदारजी त्याला उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका मिळताच दरवाजाच्या समोर जाऊन पेपर सोडवायला लागला.


पर्यवेक्षकाने त्याला याचं कारण विचारताच तो म्हणाला, “कारण मी प्रवेशपरीक्षा देतोय ना.”

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...