🤪😎😂😳🤣
गुरूजीः- सांगा मुलांनो, जगातलं सर्वात पवित्र खाद्य कोणते ?
बराच वेळ झाला, कोणीच उत्तर दिले नाही....
शेवटी बंड्या उठला आणि म्हणाला, "सर, मी सांगू ?"
गुरूजीः- सांग बरे !!
बंड्याः- तंबाखू....
कोणत्याही वारी चालते,
एकादशीला चालते,
द्वादशीला चालते,
कोणत्याही सणाला चालते,
अमावस्येला चालते, पौर्णिमेला चालते,
सकाळी चालते, रात्री दोन वाजताही चालते,
३६५ दिवस अहोरात्र चालते,
किती ही पवित्र वस्तू आणि कुणाचीही चालते, शिवाशिव नाही,
अंत्यसंस्काराच्या वेळीही चालते व जन्मावेळीही चालते. हिला खायला केंव्हाच बंधन नाही,
अगदी जगन्मान्य,
जातपात नाही, धर्म नाही, चोळून खातात, मळून देतात,
चुना लावून खातात,
भाग्यवान वनस्पती आहे हो !!
पैशापेक्षा जास्त जपतात आणि न विसरता खिशात घेतात.
सगळे विसरतील पण हिला विसरणार नाहीत.
समोरच्याला वेळ देणार नाही पण हिला खाण्यासाठी कोपर्यात जाऊन मळणार.
अतिप्रिय खाद्य.
९०० रूपये किलो आहे हो ही !!
काजूपेक्षा महाग पण गरीबातला गरीब खातो.
काजू कधी खिशात ठेवतो का ?
नाही.
पण ही खिशातल्या आतल्या कप्प्यात राहते. अगदी हृदयाला कवटाळून असते.
नाही का ?
शाळेत बंड्याचा सत्कार समारंभ आहे !!!
🤣😳😎😂🤪😛😍😜🤣
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.