Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

06 October 2015

जरा ऐका

जे लोक आपल्या गाडीची पेट्रोल टाकी फुल्ल भरून स्वत:ला श्रीमंत समजत आहेत ना,

त्यांना एक सांगतो की,


मी आत्ताच कांदा-भजी खाललीत.


01 October 2015

१० वर्षांची कमाई

१० वर्षांत कोण किती कमावतं?

शिक्षक = २५ लाख

डॉक्टर = ५० लाख

अभियंता = ५० लाख

सरकारी अधिकारी = ७५ लाख

निर्मल बाबा = ५०० कोटी

रामदेवबाबा = ११,१७७ कोटी

सत्य साईबाबा = ४०,००० कोटी


“...म्हणूनच आपल्या पुढील करियरचा चांगला विचार करा मित्रहो.”


बिचारा “कर्म”चारी

एकदा एका कर्मचार्‍याला दहशतवादी पकडतात.

ते त्याला हाल हाल करून मारण्यापूर्वी त्याची शेवटची इच्छा विचारतात.

कर्मचारी : मी एक साधासुधा कर्मचारी आहे हो. मला माझ्या बॉसशी बोलायचं आहे.

दहशतवादी चकित होतात. पण तरी ते त्याला फोन लावून देतात.

तो बिच्चारा कर्मचारी फोन लाऊडस्पीकरवर टाकतो.

कर्मचारी : हॅलो बॉस, मला दहशतवाद्यांनी पकडलंय. ते आता मला हाल हाल करू मारणारेत.

दहशतवादी मोठमोठ्याने हसू लागतात.

बॉस : अरेरेपण उद्या ऑडिट आहे. शक्य असेल तर ये.

हे ऐकून,


दहशतवाद्यांना त्या कर्मचार्‍याची दया येते आणि ते त्याला चक्क सोडून देतात.

15 September 2015

संता

एकदा संता ऑफिसला जायला निघतो.

इमारतीतून खाली आल्यावर त्याच्या लक्षात येतं की तो रुमाल आणि मोबाइल घरातच विसरलाय.
तो बायकोला फोन लावतो आणि तिसर्‍या मजल्यावरून खाली टाकायला लावतो.

बायको : रुमाल आधी टाकू की मोबाइल?

संता : मोबाइल

बायको मोबाइल टाकते पण संताचा कॅच सुटतो आणि मोबाइल खाली पडून तुटतो.


संता बायकोला जोरात ओरडून म्हणतो, “थांब, थांब. रुमाल नको टाकूस खाली. मीच वर येतो न्यायला.”

09 September 2015

कंडक्टर आणि ड्रायवरमधला फरक


शिक्षिका : सांग बंड्या, कंडक्टर आणि ड्रायवरमध्ये फरक काय असतो?


बंड्या : कंडक्टर झोपला तर कुणाचंचं तिकीट फाडलं जाणार नाही, पण ड्रायवर झोपला तर सगळ्यांचंचं फाडलं जाईल.


03 September 2015

हिंदुस्तानी-पाकिस्तानी भाई भाई


एकदा सेनेचा एक जवान आपल्या अधिकार्‍याकडे १ महिन्याची सुट्टी मागायला जातो.

अधिकारी : जा, आधी दुश्मनांचा एक रणगाडा घेऊन ये.

दुसर्‍या दिवशी तो जवान खरोखरच एक रणगाडा घेऊन येतो.

अधिकारी : अरे वा, शाब्बास. खूपच शूरवीर दिसतोस. पण हे तु कसं काय केलंस?


जवान : यात कोणती मोठी गोष्ट आहे सर? त्यांना जेव्हा १ महिन्याची सुट्टी हवी असते, तेव्हा ते पण आपल्याकडून रणगाडा घेऊन जातातच की.


मानसिकता


जपानी मानसिकता : जर तो ते करू शकतो, तर मीपण नक्कीच ते करू शकतो. जर ते कुणीच करू शकत नसेल, तर ते मला जरूर केलेच पाहिजे.


भारतीय मानसिकता : जर तो ते करू शकतो, तर त्याला ते करू देत. जर ते कुणीच करू शकत नसेल, तर मी काय जेम्स बॉन्ड आहे का?


मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...