Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

11 April 2011

सुशिक्षित लुटेरे



डॉक्टर लोक चिठ्ठीवर असं काय लिहितात की ते फक्त मेडिकल स्टोअरवाल्या लोकांनाच कळतं?

ते कदाचित लिहीत असतील की,मी ह्याला लुटलाय, तू पण लूट.

10 April 2011

दोष कुणाचा?


एकजण दवाखान्यात येतो आणि डॉक्टरांना म्हणतो, “डॉक्टरसाहेब, सगळे लोक तुम्हाला देव मानतात. तर मग मला कोणता आजार आहे ते तुम्ही मला न तपासता सांगू शकता काय?

डॉक्टर : हो, हो, नक्कीच. तुमच्या दृष्टीत दोष आहे.

रुग्ण : (अगदी खुश होऊन) हो, हो, अगदी बरोबर. तुम्ही खरोखरच देव आहात. पण तुम्ही हे कसं ओळखळत?

डॉक्टर : तुम्ही बाहेर लावलेली माझी “जनावरांचा डॉक्टर” ही पाटी वाचलेली दिसत नाही म्हणून.

डॉक्टर, सल्ले जरा जपून द्या


एक खेडवळ मनुष्य दवाखान्यात जातो.

डॉक्टर त्याला तपासतात आणि एक सल्ला देतात.

सल्ला ऐकून तो खेडवळ मनुष्य डॉक्टरांच्या कानाखाली एक खाडकन वाजवून देतो.

दवाखान्यातून बाहेर येताच बाकीचे रुग्ण त्याला विचारतात की तू डॉक्टरांना का मारले?

त्यावर तो खेडवळ मनुष्य म्हणतो, “काय वेडपट डॉक्टर आहे, या उन्हाळ्यात पार रक्त उकळायची वेळ आलीय आणि हा मला म्हणतोय पाणी उकळून पित जा.”

09 April 2011

Blood Test

संता एकदा रक्तासंबंधी माहिती असलेले पुस्तक वाचत बसलेला असतो.

त्याची बायको त्याला विचारते, "काय हो, असं आज अचानक हे पुस्तक का वाचताय?"

संता : उद्या माझी Blood Test (रक्ताची चाचणी) आहे ना म्हणून अभ्यास करतोय.



बायकोचा फोटो विघ्नहर्ता

बायको नवर्‍याला खर्चासाठी काही पैसे मागते. नवरा आपल्या पाकीटातून काढून ते देत असताना पाकिटातून त्याच्या बायकोचा फोटो खाली पडतो.

बायको आपला नवरा आपला फोटो पाकिटात ठेवतो म्हणून अगदी खुश होते.

बायको : अय्या, एवढं प्रेम करता माझ्यावर...

नवरा : अगं तुझा फोटो पाकिटात ठेवतो कारण त्यामुळं माझी संकटं फटाफट सुटतात किंवा कोणतंही कठीण काम सहज होतं.

बायको : कसं काय?

नवरा : कारण, अशावेळी मी तुझा फोटो काढून बघतो आणि त्यामुळं मला सगळी संकटं तुझ्यापुढं फालतू वाटायला लागतात.

06 April 2011

लठ्ठपणा कमी करायचाय तर...

खाऊन-पिऊन, एकाजागी बसून लठ्ठ झालेला संता मग एक दिवस डॉक्टरकडे जातो.

संता : डॉक्टर, मला माझं वजन कमी करायचंय. काहीतरी उपाय सांगा.

डॉक्टर : रोज कमीत कमी १० किलोमीटर पळा. किमान ३० दिवस हा उपक्रम चालू ठेवा आणि मग माझ्याकडे या.

३० दिवसांनी संताचा डॉक्टरांना फोन येतो.

संता : धन्यवाद डॉक्टर. माझं वजन कमी झालं. पण मी मात्र माझ्या घरापासून ३०,००० किलोमीटर दूर येऊन पोचलोय.

04 April 2011

इथे काय उणे?

एक परदेशी व्यक्ती पुणे पाहायला येते.

ती आल्यावर पुण्याविषयी माहिती करून घेण्यासाठी एका पुणेरी गाईडला विचारते, "आजपर्यंत तुमच्याइथे कोणी मोठी जन्माला आली आहे का?"

पुणेकरांची हिंदी आणि इंग्रजी तर आपल्याला माहीतच आहे.

गाईड : नाही हो. आमच्याकडे केवळ लहान बाळेच जन्माला येतात.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...