Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

05 May 2015

काय ऐकतोय मी हे?

एकदा एक पुणेकर नागपुरात विधानसभा बघायला गेले होते.

तिथे ते एका समोसे विकणार्‍या विक्रेत्याकडे रोज समोसे खात असत.

(एक दिवस) पुणेकर : काय हो, आज समोसे फारसे चवदार लागत नाहीयेत. कालचे उत्तम होते.

विक्रेता : हे पण कालचेच है ना भौ.


मग पुणेकराने पुढे त्याचा कसला अपमान केला असेल ना, च्या मारी...

04 May 2015

देवा रे देवा, ये देखो हलकट

संता ऑफिसला निघाला.

चुकून तो रस्त्याच्या उलट्या दिशेने गाडी चालवू लागला. त्याच्या लक्षातच आले नाही.


संता : अरे बापरे, आज पण खूप उशीर झालेला दिसतोय. सगळे लोक ऑफिसमधून परत घरी चाललेत.


25 April 2015

कोर्टाची पायरी


नवरा बायकोत तुंबळ युद्ध होतं आणि ते कोर्टात जातात.

न्यायाधीश : तुम्ही बायकोला मारलंत हे खरं आहे का?

नवरा : हो जज्जसाहेब.

न्यायाधीश : तुम्हाला १ लाख रुपये आणि ५० पैसे दंड ठोठावण्यात येत आहे.

नवरा : जज्जसाहेब, १ लाख रुपये ठीक आहेत, पण वरती केवळ ५० पैसे कसले?


न्यायाधीश : तो मनोरंजन कर आहे.


संयोजक असावा तर असा...




राहुल गांधींच्या सभेला खूप कमी गर्दी होत असताना, पुण्यातील सभेच्या संयोजकांनी मात्र खूप गर्दी जमवलेली.

सभा पार पडल्यानंतर संयोजकांना विचारले असता त्यांनी याचं रहस्य सांगितलं.


ते म्हणाले,मी प्रत्येकाच्या घरा-घरात एक निरोप पाठवला की तुम्ही सभेला आला नाहीत तर राहुल गांधी तुमच्या घरी येतील.


जनहितार्थ जाहीर सूचना




जरी तुमची बायको Dual Sim मोबाईल वापरत असेल, तरीही तिचा नंबर "बायको" या एकाच नावाने save करा. तो चुकूनही "बायको १" आणि "बायको २" असा save करू नका.


---  हॉस्पिटलमधील एका पेशंट कडून एक हिताचा सल्ला.





23 April 2015

आनंदोत्सव


पोलीस (एका चोराला) : काय रे, तू सोनाराच्या दुकानातून हार का चोरलास?


चोर : अहो साहेब, सोनारानेच ऑफर लावली होती की अक्षयतृतीयेच्या दिवशी शंभर टक्के लाभ घ्या म्हणून.


आतली बातमी


राहुल गांधी दोन महिन्यांची सुट्टी संपवून आले तो दिवस पुढील वर्षीपासून “राहुल गांधी दिवस” म्हणून साजरा होणार आहे.


मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...