Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

15 September 2015

संता

एकदा संता ऑफिसला जायला निघतो.

इमारतीतून खाली आल्यावर त्याच्या लक्षात येतं की तो रुमाल आणि मोबाइल घरातच विसरलाय.
तो बायकोला फोन लावतो आणि तिसर्‍या मजल्यावरून खाली टाकायला लावतो.

बायको : रुमाल आधी टाकू की मोबाइल?

संता : मोबाइल

बायको मोबाइल टाकते पण संताचा कॅच सुटतो आणि मोबाइल खाली पडून तुटतो.


संता बायकोला जोरात ओरडून म्हणतो, “थांब, थांब. रुमाल नको टाकूस खाली. मीच वर येतो न्यायला.”

09 September 2015

कंडक्टर आणि ड्रायवरमधला फरक


शिक्षिका : सांग बंड्या, कंडक्टर आणि ड्रायवरमध्ये फरक काय असतो?


बंड्या : कंडक्टर झोपला तर कुणाचंचं तिकीट फाडलं जाणार नाही, पण ड्रायवर झोपला तर सगळ्यांचंचं फाडलं जाईल.


03 September 2015

हिंदुस्तानी-पाकिस्तानी भाई भाई


एकदा सेनेचा एक जवान आपल्या अधिकार्‍याकडे १ महिन्याची सुट्टी मागायला जातो.

अधिकारी : जा, आधी दुश्मनांचा एक रणगाडा घेऊन ये.

दुसर्‍या दिवशी तो जवान खरोखरच एक रणगाडा घेऊन येतो.

अधिकारी : अरे वा, शाब्बास. खूपच शूरवीर दिसतोस. पण हे तु कसं काय केलंस?


जवान : यात कोणती मोठी गोष्ट आहे सर? त्यांना जेव्हा १ महिन्याची सुट्टी हवी असते, तेव्हा ते पण आपल्याकडून रणगाडा घेऊन जातातच की.


मानसिकता


जपानी मानसिकता : जर तो ते करू शकतो, तर मीपण नक्कीच ते करू शकतो. जर ते कुणीच करू शकत नसेल, तर ते मला जरूर केलेच पाहिजे.


भारतीय मानसिकता : जर तो ते करू शकतो, तर त्याला ते करू देत. जर ते कुणीच करू शकत नसेल, तर मी काय जेम्स बॉन्ड आहे का?


30 August 2015

बस्स दोन मिनिटं

एकदा एक भिकारी त्याच्या लहान मुलाला घेऊन सोसायटीत भीक मागायला गेला.

भिकारी : (एका महिलेला) काहीतरी भीक द्या माई. दोन दिवसांपासून उपाशी आहे.

महिला : थांबा हं...दोन मिनिटात आलेच.

आणि ती महिला काहीतरी आणण्यासाठी घरात जाते.

भिकार्‍याचा लहान मुलगा : पप्पा, त्या काकू मॅगी आणायला तर गेल्या नसतील ना?


भिकारी : हो रे बाळा, असू शकतं. भागो...


26 August 2015

कुणाला चरबी आलीय रे...

एकदा यमलोकात यमदेव निवांत बसले होते.

तेवढ्यात दरवाजावर टकटक असा आवाज झाला.

यमदेवांनी दार उघडलं तर एक मनुष्य समोर उभा होता. पण क्षणात तो गायब झाला.

यमदेवांनी दार लावलं आणि पुन्हा निद्रिस्त झाले.

पुन्हा त्यांनी दार उघडलं आणि पुन्हा तो मनुष्य समोर उभा. पण पुन्हा तो क्षणात गायब झाला.

असं ३-४ वेळा घडलं.

मग यमदेव वैतागले आणि तो दिसताच त्यावर जोरात ओरडले, “काय रे, लय चरबी आली का तुला? माझ्याशी पंगा घेतोस?”


मनुष्य : नाही देवा. मी तर पृथ्वीवर वेंटिलेटरवर आहे. ते नालायक डॉक्टर तुमची चेष्टा करतायत.


15 August 2015

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो


|| बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो ||


हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो



वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो



हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो



करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो



या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो



ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो

|| बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो ||


|| वंदे मातरम, भारतमाता की जय ||



मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...