Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

20 June 2016

नवीन हिट होणार हे शोज...



Coffee with Karan… नंतर आता स्टार वाहिनी खालील नवीन शोज आणत आहेत.

Tea with Modi…

Bournvita with Rahul…

Cough Syrup with Kejri…


09 May 2016

नक्की हसाल हा विनोद वाचून


एकदा कोकिळेने कावळ्याला विचारले, “काय रे कावळ्या, तू अजून लग्न का नाही केलं?”


कावळा : काय सांगू कोकिळाताई, लग्न न करताच एवढी काव-काव आहे आयुष्यात. तर विचार केला कि लग्नानंतर काय होईल म्हणून.


26 January 2016

पोट धरून हसा...

दोन जिगरी दोस्त असतात.
एकजण असतो खूप श्रीमंत तर दूसरा असतो गरीब, आम आदमी.

श्रीमंत मित्राकडे असते, बीएमडब्ल्यू; तर गरीब मित्राकडे असते नॅनो.

एकदा नॅनो रस्त्यात बंद पडते आणि तो गरीब मित्र श्रीमंत मित्राला मदतीसाठी बोलवतो.
श्रीमंत मित्र बीएमडब्ल्यू घेऊन येतो. तिला मागे नॅनो बांधतो.

तो आपल्या गरीब मित्राला नॅनोमध्ये बसवतो आणि म्हणतो, जर तुला वाटलं की मी जोरात गाडी चालवतोय, तर डिप्पर दे; म्हणजे मी वेग कमी करीन.

थोडं अंतर दूर जातात तेवढ्यात बीएमडब्ल्यूच्या बाजूने एक ऑडी जोरात वेगाने पुढे जाते.
मग बीएमडब्ल्यूवाला उचकतो आणि हे विसरून जातो की त्याने मागे नॅनो जोडलेली आहे.

मग काय, बीएमडब्ल्यू आणि ऑडीमध्ये जबरदस्त रेस चालू होते.
वेग १५० च्या वर जातो आणि ते पोलिसांचे बॅरीकेडस तोडून जातात.

तिथला एक पोलिस शिपाई घटनेची माहिती देण्यासाठी त्वरित आपल्या वरिष्ठांना फोन लावतो.


शिपाई : साहेब, आत्ताच बीएमडब्ल्यू आणि ऑडी या गाड्यांमध्ये रेस चालू असताना त्या आपले बॅरीकेडस तोडून गेलेत. पण ते सोडा सर. हैराण करणारी गोष्ट ही आहे की, या दोन गाड्यांची रेस चालू असताना एक नॅनोवाला मागून ओवरटेकिंगसाठी नुसते डिप्परवर डिप्पर मारत होता.



सतर्क रहा...


आपल्या देशात “हाय अलर्ट” म्हणजे पोलिसाला हातात काठी पकडवून नाक्या-नाक्यावर उभे करणे.


जसे काय दहशतवादी “एके ४७” घेऊन नव्हे तर “म्हशी” घेऊन हल्ला करणार आहेत.


अडाणी रे...अडाणी…!!!


गावाकडचे लोक एकदा लग्नासाठी मुंबईला गेले.

पाटील आत जेवणाच्या हॉलमध्ये गेल्यावर “salad”चे खूप सारे प्रकार बघून लगेच बाहेर आले.


पाटील म्हणतात,टाइम हाय, आजून बी भाजीच चिरित्यात.


गुरुत्वाकर्षणाचा नियम


शिक्षक : बंड्या, काय रे कारट्या? डुलक्या घेतोस काय?


बंड्या : नाही मास्तर. गुरुत्वाकर्षणामुळं डोकं पडतंय.


21 January 2016

नागिन डान्स एक्स्पर्ट


नागिन डान्स एक्स्पर्ट व्हायचं असेल तर ती काही खायची गोष्ट नाही.

तुम्ही एका दिवसात नागिन डान्स एक्स्पर्ट व्हायची स्वप्नं पहात असाल, तर तो तुमचा गैरसमज आहे.

तुम्हाला माहितीये का?


लहानपणी एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून जमिनीवर लोळणारेच पुढे जाऊन नागिन डान्स एक्स्पर्ट होऊ शकतात.


मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...