Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

29 January 2013

गावचं हॉटेल


एका बँकेचा मॅनेजर एका दुर्गम गावात बँकेच्या कामानिमित्त जातो.

तिथं राहायला बँकेचे क्वार्टर नसल्याने एका हॉटेलात जातो.

मालक त्याला खोली दाखवून देतो.

मग मालक विचारतो, “साहेब, तुम्हाला सकाळी पाच वाजता उठवायला सांगू का नोकराला?

साहेब : नको, नको. इतक्या लवकर नको. मीचा सकाळी सहा वाजता उठतो.

मालक : मग कृपा करून नोकराला उठवाल का?

जरा सांगा या सरदारला...


एक सरदार स्वारगेटला बससाठी थांबला होता.

बराच वेळ झाला तरी हडपसरची बस काही येईना म्हणून तो वैतागला होता.

बसस्टॉपवर उभ्या असलेल्या दुसर्‍या एका प्रवाशाला त्याने विचारले, “ओ, हडपसरला किती नंबरची बस जाते?

प्रवाशी : २०७

सरदार : अरे बापरे. मी इथे नवखा आहे. मला कृपया करून सांगाल का, की सकाळपासून आतापर्यंत किती बस गेल्या आहेत?

27 January 2013

अशिक्षित दरोडेखोर


एकदा चार दरोडेखोर एका बँकेत दरोडा टाकतात.

ते तिजोरी फोडतात आणि त्यांच्या हाती खूप सारी नोटांची बंडले लागतात.

एक दरोडेखोर तिथेच बँक मॅनेजरच्या डोक्यावर पिस्तूल ठेवून म्हणतो, “नीट मोज किती आहेत ते.”

दूसरा दरोडेखोर त्याला ओरडतो, “ए, चल. ही काय वेळ आहे का नोटा मोजत बसायची?

पहिला : तुम्ही नंतर भांडणं करताल?

दूसरा : अरे, त्यात काय एवढं? उद्या पेपरात छापून येईलच की.

26 January 2013

सरदारचा जन्मदिवस

सरदार एका कंपनीत मुलाखत द्यायला जातो.

मुलाखतकार : तुमची जन्मतारीख काय?

सरदार : २६ जानेवारी.

मुलाखतकार : वर्ष कोणतं?

सरदार : कोणतं काय? दरवर्षीच.

02 January 2013

Bond…or...Parol ???


कॉलेजमधून प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांकडून कामावर रुजू होताना बॉन्डवर सही घेतली जाते.

असाच एक विद्यार्थी एका नामांकित कंपनीत दोन वर्षे काम करून दुसर्‍या कंपनीत मुलाखतीला जातो.

मॅनेजर : तुम्ही पहिल्या कंपनीत तब्बल दोन वर्षे काम केलं आणि आता अशी कोणती गोष्ट घडली की तुम्ही कंपनी सोडली.

विद्यार्थी : अहो काय करू? वर्षभर सोडायची सोडायची म्हणत होतो. शेवटी आता ५० हजार भरून पॅरोलवर सुटून आलोय.

सेल्समन...बाप रे बाप.


एक सेल्समन पुण्यातल्या एका उद्योगपतीच्या ऑफिसात फोन लावतो.
सेल्समन : नमस्कार, साहेब आहेत का?

उद्योगपती स्वत: फोन उचलतात. पण त्यांना संशय येतो की हा तोच एकदा भेटलेला आणि चिकटूगिरी करणारा दिसतोय.

उद्योगपती : तुम्ही सेल्समन आहात, टेलिफोन बिलवाले आहात की साहेबांचे कुणी मित्र वगैरे आहात?

सेल्समन चलाखी करण्याचा प्रयत्न करतो.

सेल्समन : तीनही.

उद्योगपती : बरं.......ते जरा मीटिंगमध्ये आहेत, बाहेरगावी गेले आहेत आणि प्रत्यक्षात येऊनच भेट घ्या.

सैनिक का बनायचं?


मराठा बटालियनमधल्या दोन शूर जवानांचा हा संवाद.

पहिला जवान दुसर्‍याला : तू सैन्यात का आलास?

दूसरा जवान : कारण मी अनाथ आहे आणि मला युद्ध आवडतं. पण तू विवाहित असताना का आलास सैन्यात?

पहिला जवान : कारण मला शांतता हवी होती म्हणून.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...