Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

26 January 2016

अडाणी रे...अडाणी…!!!


गावाकडचे लोक एकदा लग्नासाठी मुंबईला गेले.

पाटील आत जेवणाच्या हॉलमध्ये गेल्यावर “salad”चे खूप सारे प्रकार बघून लगेच बाहेर आले.


पाटील म्हणतात,टाइम हाय, आजून बी भाजीच चिरित्यात.


गुरुत्वाकर्षणाचा नियम


शिक्षक : बंड्या, काय रे कारट्या? डुलक्या घेतोस काय?


बंड्या : नाही मास्तर. गुरुत्वाकर्षणामुळं डोकं पडतंय.


21 January 2016

नागिन डान्स एक्स्पर्ट


नागिन डान्स एक्स्पर्ट व्हायचं असेल तर ती काही खायची गोष्ट नाही.

तुम्ही एका दिवसात नागिन डान्स एक्स्पर्ट व्हायची स्वप्नं पहात असाल, तर तो तुमचा गैरसमज आहे.

तुम्हाला माहितीये का?


लहानपणी एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून जमिनीवर लोळणारेच पुढे जाऊन नागिन डान्स एक्स्पर्ट होऊ शकतात.


18 January 2016

Made In India…Antivirus!!!


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हापासून “Made In Indiaचालू केलंय, तेव्हापासून लोकं भन्नाट आयडिया घेऊन नवनवीन उद्योग चालू करू लागलेत.

चालू करू लागलेत म्हणण्यापेक्षा नसते उद्योग करू लागलेत म्हणा.
एकाने म्हणे “Made In India अॅंटीवायरस” बनवण्याचा उद्योग चालू केला.

त्याचं प्रात्यक्षिक बघण्यासाठी देशोदेशीचे सॉफ्टवेअर इंजीनियर आले.
त्याने सर्वांना त्यासाठी आपल्या घरी बोलावले.

सर्वजण त्या पोराच्या घरी गेले. बेल वाजवली.

त्या “दीड”शहाण्याने दार उघडले आणि एक स्मितहास्य करून सर्वांचे स्वागत केले.

त्याच्या दरवाज्यावरची टांगलेली लिंबू मिरची पाहून एकाने त्याला विचारले, “हे काय आहे?”

तो पोरगा म्हणतो, हाच तो Made In India...अॅंटीवायरस.

मग काय,

असा कुथवला ना त्या शहाण्याला...


14 January 2016

तुमी असाल अंबानी, नायतर खंबानी


अंबानी : जर मी सकाळी कार घेऊन निघालो तर संध्याकाळपर्यंत अर्धी प्रॉपर्टीपण बघून होत नाही.


गावाकडचा बेवडा : ओ शेठ, आमच्याकडं पण हुती तसली खटारा कार. आमी इकून टाकली.


19 December 2015

नाम है विजय दीनानाथ चौहान, हांय...


अमिताभ बच्चन आपल्या नुकत्याच घेतलेल्या नव्याकोर्‍या लक्झरी कार ओस्टिन मोर्टिन मधून जात होता.

अचानक अमिताभला कार चालविण्याची हुक्की आली.

त्याने ड्रायवरला मागे बसविले आणि स्वत: कार चालवण्याचा आनंद घेऊ लागला.

सिग्नल तोडल्याने एका ट्राफिक हवालदाराने गाडी अडवली.

आत वाकून बघतो तर अमिताभ !!!

हादरलाच तो हवालदार. त्याने आपल्या एसीपी साहेबांना हाक मारली.

हवालदार : सर, सिग्नल तोडला म्हणून मी ही गाडी अडवली. पण पावती फाडण्याची माझी हिम्मतच होत नाहीये. फार मोठी व्यक्ती बसलीय आत.

एसीपी : कोण राजा बसलाय?


हवालदार : सर, ते माहीत नाही. पण त्याने अमिताभ बच्चनला ड्रायवर ठेवलय.


Excuse me...


जर तुम्ही जिन्यात किंवा कुठेही उभे असाल जेणेकरून दुसर्‍यांना येण्या-जाण्यासाठी अडथळा निर्माण करत असाल तर,
एक गोष्ट लक्षात ठेवा.


जर कुणी तुम्हाला “Excuse me!असं कितीही अदबीने म्हणालं,

तरी त्याचा दूसरा अर्थ (त्या व्यक्तीच्या मनातला) हाही असतो की, सरक ए, बावळट कुठला.


मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...