Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

05 August 2015

आता भीती कुणाची कशाला?


बायको : अहो, इकडे तोंड करून झोपा ना. मला फार भीती वाटतेय.

नवरा : वा गं बाई. तुला फक्त स्वत:चीच काळजी. मग भले घाबरून माझा जीव गेला तरी चालेल, हो ना?


अरे छोड दो ये nonsense बाते...

एक बेवडा रात्रीचा रस्त्याने झिंगत चाललेला असतो.

तिथून एक पोलिस चाललेला असतो.

पोलिस : ए, इकडं ये.

बेवडा : काय साहेब? मी पिलेला असलो तरी शुद्धीवर आहे बरं का. हां...

पोलिस : मग एवढा शहाणा आहेस तर कशाला पितोस ती दारू? त्यापेक्षा दूध पी. किमान ताकद तरी येईल अंगात. काय अवस्था करून घेतलीये रे स्वत:ची...

बेवडा : ओ साहेब, कुणी सांगितलं की दूध पिऊन ताकद येते म्हणून. दूध पिऊन तुम्ही ती समोरची भिंत हलवू शकता का?

पोलिस : नाही बाबा.


बेवडा : हां...पण दारू पिल्यावर ती भिंत स्वत:हून कशी थरथर कापते बघा एकदा.


03 August 2015

वजन कसं कमी कराल?

वजन कसं कमी कराल?

सोप्पं आहे.

एक सोप्पा व्यायाम करायचा.

तो असा की तोंड पहिल्यांदा डावीकडे वळवायचं मग उजवीकडे.

हा व्यायाम जेव्हा कुणी तुम्हाला काही खायला देईल, तेव्हा पुन्हा पुन्हा करायचा.

इतर वेळी नाही केलात तरी चालेल हं...


कह्याला काव काव करून कावत्यात कायनू?

एकदा एका कोकिळेने एका कावळ्याला विचारले...

“ए कावळ्या, तू अजून लग्न का नाही केलेस?”


कावळा : लग्न न करताच कावळ्याच्या आयुष्यात एवढी काव काव आहे, मग नंतर तर कित्ती असेल म्हणून.


अतिआदर...


आम्ही इंजिनियरिंगला असताना पेपर रिकामा ठेवायचो कारण,

आपल्या आ.मास्तरांना असं वाटायला नको की,
.
.
.

“बघा, पोरं कशी उत्तरं देतायत आम्हाला.”


02 August 2015

सहानुभूती? ठेव तुझ्याकडेच...

एक बेवडा नेहमीप्रमाणे डुलत घरी येतो.

बायको : जो माणूस रोज निर्लज्जासारखा दारू पिऊन घरी येतो, त्याच्याबद्दल माझ्या मनात बिलकुल सहानुभूती नाहीये, समजलं?


बेवडा : ए चल हट...ज्याला रोज दारू मिळते ना, त्याला तुझ्या सहानुभूतीची गरजच नाहीये, समजलं?


28 July 2015

मुर्खांची जनगणना


मुर्खांची जनगणना कशी केली जाते माहितीये?

विदेशी कंपन्यांना कंत्राट दिले जाते.

मग त्या कंपन्या फेसबुकसारख्या ठिकाणी एक app किंवा post टाकतात.

की,

“या post मध्ये १ लिहा आणि जादू पहा.”
.
.
.

तुम्ही कधी असे १,, वगैरे लिहिले आहे का?

असेल तर ही post like करा पटकन.


मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...