Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

03 June 2011

संन्यास म्हणजे काय?


साधू-संत, वैरागी, संन्यासी या लोकांचं आयुष्य किती कठीण असेल याची जाणीव तेव्हा होते,

जेव्हा,


अगदी तासभरासाठी जरी इंटरनेट बंद पडतं.


एक छान किस्सा


सरदारजी एकदा रस्त्याने जात असतो.

त्याच्याजवळ एक पुस्तक विक्रेता येतो आणि त्याला एक छानसे पुस्तक विकत घ्यायची विनंती करतो.

सरदारजीला ते पुस्तक आवडतं. तो २००० रुपयांना ते विकत घेतो.

पैसे हातात मिळताच विक्रेता सरदारजीला एक सल्ला देतो, की कुठल्याही परिस्थितीत या पुस्तकाचं शेवटचं पान उचकटून पाहू नका नाहीतर तुमचं मानसिक संतुलन बिघडेल म्हणून.

सरदारजी बिचारा घाबरतो. असेच काही दिवस जातात आणि मग न राहवून शेवटी घाबरत घाबरत का होईना पण मोठ्या धाडसाने शेवटचं पान उचकटतो.

त्यावर लिहिलेलं असतं, पुस्तकाची किंमत २०/- रुपये.

02 June 2011

अंगठ्याचा वापर



लहान मुलं अंगठ्याचा वापर चोखण्यासाठी करतात,

अडाणी लोक त्याचा वापर सही म्हणून करतात,

जिंकलेले विजय दर्शविण्यासाठी त्याचा वापर करतात,

तर

माझे फॅन अंगठ्याचा वापर माझे मराठी विनोद वाचल्यावर कौतुक करण्यासाठी करतात.
.
.
.

मला माहितीये, तुम्ही पण कराल...

खाली अंगठा आहे, त्यावर क्लिक करून तुमच्या मित्रांकडे कौतुक करा.

01 June 2011

जरा डोक्याने पैसा कमवा


फेसबूक वापरुन तुम्हाला पैसा कमवायचा आहे का?

मग एक काम करा............

फेसबूकच्या Settings मध्ये जा.

नंतर Account Settings मध्ये जा.

आता Deactivate your account वर क्लिक करा.
.
.
.
आणि चला बघू आता कामाला लागा.

सारखेपणा शोधा.

सूर्य आणि बायकोमध्ये सारखेपणा ओळखा.
.
.
.
.
.
.
सोप्पं आहे,


तुम्ही दोघांकडे रोखून पाहू शकत नाही.


हुशार कैदी


एक कैदी त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी २ वर्षांचा तुरुंगवास भोगत असतो.

त्याची बायको त्याला सारखी पत्र पाठवून मी हे करू का, ते करू का, कधी काय करू, वगैरे गोष्टी विचारत असते.

अशीच ती एकदा नवर्‍याला पत्र लिहिते आणि विचारते, “मला घरासमोरील बागेत झेंडू, गुलाब, सदाफुली आणि रातराणीची फुलझाडं लावावीशी वाटताहेत. तर मग कधी लावू?”

कैदी मात्र हुशार असतो. त्याला माहीत असतं की आपलं पत्र नक्कीच जेलरनी वाचलेलं असणार.

कैदी लिहितो, “तू बागेत कसलीही फुलझाडं लाव. माझी कसलीही हरकत नाही. पण घरासमोरील बागेत नव्हे तर घरामागील बागेत लाव. कारण, घरासमोरील बागेत मी खूप पैसा पुरून ठेवलाय.”


काही दिवसांनी पुन्हा कैदयाच्या बायकोचं पत्र येतं. ती लिहिते, “अहो, २ दिवसांपूर्वी काही लोक कुदळ-फावडी घेऊन आले आणि त्यांनी घरासमोरील आणि घरामागील बाग पूर्ण खणून काढली.”

कैदी लिहितो, “होय, मग हीच योग्य वेळ आहे फुलझाडं लावायची, आणि हो घरामागील बागेतही झाडं लाव बरं.”

आम्ही नाही सुधारणार !


नासा” म्हणजे अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था मंगळावर एक माणूस पाठवायचं ठरवते.
त्यासाठी ते संपूर्ण जगभरातील लोकांचे अर्ज मागवतात.

मंगळवारी करण्यासाठी मात्र एक अट ठेवलेली असते, ती म्हणजे, तिकडे गेलेल्या व्यक्तीला परत पृथ्वीवर येता येणार नाही. याचाच अर्थ त्या व्यक्तिचं आयुष्यच जणू अर्पण करायचं होतं.
आता कोण होणार यासाठी? असा विचार कदाचित तुम्ही कराल, पण तीन व्यक्ती यासाठी तयार होतात.

पहिली व्यक्ती असते, ऑस्ट्रेलियाचा एक प्रख्यात डॉक्टर.
दुसरी व्यक्ती असते, जपानचा एक प्रख्यात इंजिनियर.
तिसरी व्यक्ती असते, भारताचा एक प्रख्यात राजकारणी म्हणजे खुद्द – लालूप्रसाद यादव.

धक्का बसला ना?????????????

या तिघांची मुलाखत घेतली जाते आणि त्यांना प्रत्येकी एक प्रश्न विचारला जातो की ते या मोहिमेसाठी किती पैसे घेणार?

डॉक्टर : १ अब्ज रुपये, कारण मी हा पैसा संशोधनास देऊ इच्छितो.

इंजिनियर : २ अब्ज रुपये, कारण मी हा पैसा शैक्षणिक दर्जा सुधारणेसाठी एका संस्थेस देऊ इच्छितो.

लालूप्रसाद यादव : ३ अब्ज रुपये.

नासा : का हो, तुम्ही सगळ्यात जास्त रक्कम मागताय. तुम्ही काय करणार आहात या पैशांचं?

लालूप्रसाद यादव : मी १ अब्ज तुम्हाला देणार. १ अब्ज डॉक्टरला देऊन त्याला मंगळावर पाठवणार आणि १ अब्ज मी घेणार.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...