Now we are on YouTube!!!
Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
24 May 2011
23 May 2011
जीवनसत्व
एक खेडूत दवाखान्यात जातो आपल्या आजारी असलेल्या मुलाला घेऊन.
डॉक्टर त्याला तपासतात आणि एक सल्ला देतात.
डॉक्टर : याच्या शरीरात जीवनसत्वांची कमतरता आहे. असं करा मेडिकलमध्ये जा आणि “क” जीवनसत्व घ्या.
खेडूत मेडिकलमध्ये जातो. पण त्याला “क” जीवनसत्व लक्षात राहत नाही आणि इंग्रजीपण काही येत नसतं.
केमिस्ट : कोणतं देऊ? A,B,C, की D ???
खेडूत : कोणतंही द्या की. आमचं बाळया अजून शाळेत जात न्हाई. त्यामुळं त्याला इंग्रजी अक्षर समजत न्हाई बगा.

21 May 2011
वाट पहात आहे...
ट्रॅफिक हवालदार : अहो, थांबा थांबा. १०० च्या स्पीडने गाडी का चालवताय?
वाहनचालक : तुम्हीच तर तो बोर्ड लावलाय ना? (बोर्डकडे बोट दाखवून)
ट्रॅफिक हवालदार : हो, मग?
वाहनचालक : जरा नीट वाचा की मग...त्यावर लिहिलंय, "लक्षात ठेवा, घरी कुणीतरी तुमची वाट पहात आहे," म्हणून.
वाहनचालक : तुम्हीच तर तो बोर्ड लावलाय ना? (बोर्डकडे बोट दाखवून)
ट्रॅफिक हवालदार : हो, मग?
वाहनचालक : जरा नीट वाचा की मग...त्यावर लिहिलंय, "लक्षात ठेवा, घरी कुणीतरी तुमची वाट पहात आहे," म्हणून.
एक संधी
एक ग्राहक दुकानात येतो. एक वस्तु उचलतो, ठेवतो, दुसरी उचलतो, ठेवतो. दुकानदार हे सगळं बघत असतो, पण तो ग्राहक काहीतरी घेईल म्हणून दुकानदार दुसर्या गिर्हाइकांना आपले वस्तु देणे चालू ठेवतो.
शेवटी बराच वेळ झाला तरी हा ग्राहक काही घेत तर नाही, पण उगाच एक एक वस्तु हाताळत बसलेला पाहून मग दुकानदारही वैतागतो.
दुकानदार (वैतागून) : काय हो, काय पाहिजे तुम्हाला? काय लावलंय मघापासून?
ग्राहक : एक संधी.
20 May 2011
आपकी फर्माईश
एकदा काय होतं, नागपूरकर एका पुणेकराच्या शेजारी राहायला येतात.
नागपूरकर म्हणजे लय डांबिस माणूस असतो. शेजारी राहणारे आपले पुणेकर बंधु मात्र त्याला आपण पुण्यात राहत आहोत याची सातत्याने जाणीव करून देत असतात.
एक दिवस पुणेकरांना एक आयतीच संधी चालून येते.
नागपूरकर त्या दिवशी संध्याकाळी आपल्या पत्नीसोबत खरेदीला बाहेर पडतात. आपल्या बाइकवरून जात असताना त्यांचं पाकीट त्यांच्या नकळत खिशातून रस्त्यावर पडतं.
आपले पुणेकर बंधु कुणाच्याही नकळत हे उचलतात आणि घरात घेऊन जातात. पाकीट उघडून पाहतात तर काय, ५०० च्या २० नोटा त्यात असतात. आता ह्या डांबिस नागपूरकरला चांगला धडा शिकवायचा पण तोही पुणेरी स्टाइलमध्ये असा ते निश्चय करतात.
नागपूरकराला रोज दुपारी २:०० च्या सुमारास रेडिओ मिरचीवरचा “आपकी फर्माईश” हा कार्यक्रम ऐकायची सवय असते.
पुणेकर नेमक्या याच वेळी रेडिओ मिरचीला फोन लावतात.
पुणेकर : मला एक पाकीट सापडेलेलं आहे. त्यात १०,००० रुपये, वाहन चालवण्याचा परवाना, क्रेडिट कार्ड, ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे आहेत. त्या व्यक्तीचा ओळखपत्रावरील पत्ता आहे, श्री. हेमंत नागपूरकर, रा. सदाशिव पेठ, स्वप्न कुंज, ३ रा मजला...
रेडिओ जॉकी : अच्छा, किती प्रामाणिकपणा...म्हणजे तुम्हाला ते पाकीट परत करायचं आहे तर.
पुणेकर : नाही हो. माझी तुम्हाला एक विनंती आहे की, आपल्या "आपकी फर्माईश" या कार्यक्रमात त्यांच्यासाठी एक दु:खी गाणं लावावं.
फरक
नागपूरकर : अहो, तुम्हाला पोहता येतं का हो?
पुणेकर : नाही.
नागपूरकर : कमाल आहे बे ! कुत्र्यालापण पोहता येते आजकाल. म्हणजे कुत्रे तुमच्यापेक्षा भारीये बे.
पुणेकर : मग तुम्हाला तर नक्कीच पोहता येत असेल ना?
नागपूरकर : ही काय विचारायची गोष्ट आहे का बे.
पुणेकर : मग मला सांगा, तुमच्यात आणि त्या कुत्र्यात काय फरक.
Subscribe to:
Posts (Atom)
मराठी म्हणींचा शोध
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...