Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

18 August 2013

सरदारजी बसला M.P.S.C. च्या परीक्षेला

सरदारजी M.P.S.C. च्या परीक्षेला बसला होता.

परीक्षेच्या दिवशी परीक्षागृहात सर्व परीक्षार्थिंना उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका वाटण्यात आल्या.

सरदारजी त्याला उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका मिळताच दरवाजाच्या समोर जाऊन पेपर सोडवायला लागला.


पर्यवेक्षकाने त्याला याचं कारण विचारताच तो म्हणाला, “कारण मी प्रवेशपरीक्षा देतोय ना.”

सरदारजीने भरला पासपोर्टचा अर्ज

एक सरदार पासपोर्ट काढायला गेला.
अर्ज भरताना त्यात पर्याय होते,

१. आपल्याला कधी अटक झालेली आहे का?
सरदारचे उत्तर : नाही.

२. कारण? (हा प्रश्न त्यांच्यासाठी होता, ज्यांना अटक झालेली होती.)

सरदारचे उत्तर : मी पोलिसांना सापडलोच नाही.

15 August 2013

सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

जर तुम्ही विवाहित असाल तर कृपा करून हा संदेश तुम्ही वाचू नका,



कारण तो तुमच्यासाठी नाही.




बाकी सर्वांना,





स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


Just joking yaar...


“सर्वांनाच स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!



27 July 2013

पुणेकराची शिकवणी

एक नागपूरकर : काय हो तुम्हाला मेंदू आहे का?

पुणेकर : हो, आहे की.

नागपूरकर : मग काय त्याच्यापर्यंत तुमच्या शरीरातलं रक्त पोहोचत नाही का?

पुणेकर : नाही ना.

नागपूरकर : तरीच...तुम्ही असे तिरसट स्वभावाचे आहात.

पुणेकर : हो, असेल कदाचित. काय हो, याचा अर्थ तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा चांगलाच होतोय म्हणायचं की.

नागपूरकर : (पुणेकराने एवढ्या सहजपणे आपली लाज घालवून घेतली या खुशीत) म्हणजे काय???


पुणेकर : म्हणजे काय माहितीये? याचं तुम्हाला वैज्ञानिक उत्तर देतो बघा. याचा अर्थ असा की द्रव पदार्थ हा नेहमी रिकाम्या जागेकडे वाहतो, हा नियम इथे लागू पडतो.

भन्नाट डोक्याचा सरदार

एक उद्योगपती सरदार अमेरिकेत वास्तव्यास असतो.

तो तेथील बँकेत जाऊन आर्थिक अडचणीसाठी दहा हजार डॉलरचं कर्ज मागतो आणि दोन आठवड्यांनंतर भारतातून परत येताना तो ही रक्कम आणून कर्ज फेडण्याचं आश्वासन देतो.

बँक त्याला गॅरंटी म्हणून बँकेकडे काय गहाण ठेवणार म्हणून विचारते?
सरदार त्याची नवी कोरी फेरारी बँकेकडे ठेवण्याचं मान्य करतो.

बँक त्याला कर्ज देते आणि ही महागडी कार सुरक्षितरित्या आपल्या ताब्यात ठेवते. दोन आठवड्यांनी सरदार परत आल्यावर बँकेचे कर्ज म्हणून दहा हजार डॉलर आणि व्याज म्हणून १०० डॉलर अशी रक्कम परत करतो.

बँक त्याला विचारते, “तुम्ही करोडपती असताना केवळ १०००० डॉलरसाठी ही ३ लाख डॉलरची गाडी चक्क गहाण का ठेवलीत?


तेव्हा सरदार म्हणतो, “त्याचं काय आहे, भारतात महत्वाच्या कामासाठी तातडीने जावं लागणार होतं. तेव्हा गाडी कुठे पार्क करणार हा मोठा प्रश्न होता. तो प्रश्न १०० डॉलरमध्ये असा सोडवला.”

नोकरीसाठी…

एक उमेदवार नोकरी मागण्यासाठी एका नामांकित कंपनीत गेला.

त्याचा तो ज्या पदासाठी नोकरी मागत होता, त्याच्याशी काहीएक संबंध नव्हता.

साहजिकच, मॅनेजरने त्याला नकार दिला.

मॅनेजर : मला क्षमा करा. पण तुम्हाला देण्यासारखं माझ्याकडं काहीही काम नाहीये.


उमेदवार : अहो साहेब, कामाची चिंता करू नका. तुम्ही मला फक्त नोकरी द्या. तुमच्याकडे मी कधीही कामाची मागणी करणार नाही.

अदृश्य पोलीसमामा

एकजण चौकात सिग्नलला लाल दिवा असताना आपली गाडी दामटतो.

झाडामागे लपलेले पोलीसमामा चटकन गाडीसमोर येऊन त्याला बाजूला घेतात.

मामा : काय रे, लाल दिवा दिसला नाही का?


तो : साहेब, लाल दिवा दिसला की. पण तुम्ही नाही दिसलात ना.


मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...