Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

09 April 2011

बायकोचा फोटो विघ्नहर्ता

बायको नवर्‍याला खर्चासाठी काही पैसे मागते. नवरा आपल्या पाकीटातून काढून ते देत असताना पाकिटातून त्याच्या बायकोचा फोटो खाली पडतो.

बायको आपला नवरा आपला फोटो पाकिटात ठेवतो म्हणून अगदी खुश होते.

बायको : अय्या, एवढं प्रेम करता माझ्यावर...

नवरा : अगं तुझा फोटो पाकिटात ठेवतो कारण त्यामुळं माझी संकटं फटाफट सुटतात किंवा कोणतंही कठीण काम सहज होतं.

बायको : कसं काय?

नवरा : कारण, अशावेळी मी तुझा फोटो काढून बघतो आणि त्यामुळं मला सगळी संकटं तुझ्यापुढं फालतू वाटायला लागतात.

06 April 2011

लठ्ठपणा कमी करायचाय तर...

खाऊन-पिऊन, एकाजागी बसून लठ्ठ झालेला संता मग एक दिवस डॉक्टरकडे जातो.

संता : डॉक्टर, मला माझं वजन कमी करायचंय. काहीतरी उपाय सांगा.

डॉक्टर : रोज कमीत कमी १० किलोमीटर पळा. किमान ३० दिवस हा उपक्रम चालू ठेवा आणि मग माझ्याकडे या.

३० दिवसांनी संताचा डॉक्टरांना फोन येतो.

संता : धन्यवाद डॉक्टर. माझं वजन कमी झालं. पण मी मात्र माझ्या घरापासून ३०,००० किलोमीटर दूर येऊन पोचलोय.

04 April 2011

इथे काय उणे?

एक परदेशी व्यक्ती पुणे पाहायला येते.

ती आल्यावर पुण्याविषयी माहिती करून घेण्यासाठी एका पुणेरी गाईडला विचारते, "आजपर्यंत तुमच्याइथे कोणी मोठी जन्माला आली आहे का?"

पुणेकरांची हिंदी आणि इंग्रजी तर आपल्याला माहीतच आहे.

गाईड : नाही हो. आमच्याकडे केवळ लहान बाळेच जन्माला येतात.

03 April 2011

वरुन _ _ _ खाली

एक दारुड्या फुल्ल टाईट होऊन घरी जातो.
बायकोशी त्याचं चांगलंच वाजतं.

हा राहत असतो पहिल्या मजल्यावर.
बायको एक लाथ घालते ह्याच्या केपटात, तसा हा गच्चीवरून खाली पडतो.

जोरात धाड ssss असा आवाज आल्याने सगळे इमारतीतले लोक खाली पळत येतात आणि त्याला विचारतात, "काय झाले हो?"

बेवडा : मला पण नाही कळलं काय झालं ते. मी पण जस्ट आत्ताच तुमच्याआधी खाली आलो.

02 April 2011

नान

संता हॉटेलमध्ये जेवायला जातो.

जेवण अतिशय स्वादिष्ट असल्याने तो अगदी दाबून जेवतो.

त्याने जवळपास १२-१३ नान म्हणजे बटर लावलेल्या रोटया हादडलेल्या असतात.

जेवण झाल्यावर त्याचं पोत चांगलंच दुखू लागतं.

तो स्वच्छतागृहात (टॉयलेटमध्ये) जातो आणि जोरजोरात देवाचा धावा करू लागतो, "हे भगवान, या तो जान निकाल दे या नान निकाल दे."



ज्याचे काम त्याने करावे




प्राध्यापक : ए, तुझ्या बाजूच्या त्या पोराला उठव रे. मी शिकवतोय एवढं जीव तोडून आणि हा झोपलाय मख्खासारखा.

विद्यार्थी : तुम्ही झोपवलंय त्याला. उठवा तुम्हीच.

01 April 2011

आंधळे नवरा बायको














बायको : काय हे नशीब तुमचं ? मी किती सुंदर आहे, ते तुम्ही पाहू शकला असतात तर?

नवरा : एवढीच सुंदर असतीस तर माझ्याशी का लग्न केलं असतंस का? मी आंधळा आहे. वेडा नाही.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...