Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

02 April 2012

महात्मा गांधींचं स्वप्न...आणि सत्य.


एक दिवस महात्मा गांधी सोनिया गांधींच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, “मी मरताना कॉंग्रेसला नम्रपणा, ईमानदारी, टोपी, चष्मा आणि माझी काठी दिली होती. कुठे आहे ते सगळं?

सोनिया गांधी :sss sss ब...टोपी तर राहुल लोकांना घालतोय, नम्रपणा मी स्वत:कडे ठेवलाय, चष्मा मनमोहनसिंगांना दिलाय, ईमानदारी स्विस बँकेत सुरक्षित आहे आणि आपली काठी “आम आदमी”च्या सेवेत २४ x ७ कार्यरत आहे.

मला शिकायचंय मास्तर...


बंड्या : मास्तर, मला संस्कृत शिकवा.
मास्तर : का रे, आपल्या शाळेत संस्कृत हा विषयच नसताना तुला संस्कृत शिकावसं का वाटतंय?
बंड्या : कारण ती देवांची भाषा आहे आणि मला स्वर्गात गेल्यावर ती फार उपयोगी पडेल म्हणून.
मास्तर : ए गुंडाड माणसा, तुला कशावरून वाटतंय तुला स्वर्ग मिळेल म्हणून? ठीक आहे असू दे, पण समजा नरक मिळाला तर?
बंड्या : ssss य मास्तर, त्याची काय पण काळजी नाय आपल्याला. शिव्या देण्यात आपण डिग्री मिळवलेली हाय.

01 April 2012

प्रश्नाचं उत्तर दे बंड्या...


गुरुजी : बंड्या, सांग बरं A, B, C, D मध्ये किती अक्षरे असतात?

बंड्या : ४

गुरुजी : अरे मूर्खा, मी फक्त A, B, C, आणि D ही चारच अक्षरं नाही विचारली. नीट सांग.

बंड्या : (थोडा विचार करून) ५२.

गुरुजी : आं...कसं काय?

बंड्या : मोठी २६ (Capital) आणि लहान २६ (Small) अक्षरे.

मस्तीखोर उंदीर


एक हत्ती हुक्का ओढत बसलेला असतो.

तेवढ्यात एक उंदीर त्याच्याजवळ येतो.

उंदीर : महाराज, आपल्याला असं व्यसनी होणं शोभतं का? टाकून द्या तो हुक्का अन चला माझ्याबरोबर मी तुम्हाला दाखवतो आपलं जंगल किती सुंदर आहे ते?

हत्ती काही न बोलता त्याच्याबरोबर चालू लागतो. बर्‍यापैकी जंगल फिरून झाल्यावर ते सिंहाच्या गुहेजवळ येतात.

सिंह पण आरामात सिगारेट फुंकत बसलेला असतो. तोसुद्धा सिंहाला असंच सांगून त्याच्याबरोबर यायला सांगतो.

सिंह आपल्या तोंडातली सिगारेट खाली टाकतो आणि पायाखाली विझवतो. उंदराजवळ जाऊन त्याच्या दोन मुस्कटात लगावतो.

हत्ती : महाराज कशाला मारता या बिचार्‍याला?
सिंह : मागच्या वेळेस मला ह्याने असंच काही-बाही सांगून दोन तास जंगलात फिरवलं.

30 March 2012

हे काय भलतंच?

दोन झुरळे ICU त एकमेकांशेजारी दाखल झालेले असतात.

पहिले झुरळ : काय रे तुला काय झालं?

दुसरे झुरळ : काय सांगू? एक मुलगी मला पाहून इतकी जोरात किंचाळली की मला हार्ट अटॅकच आला.

पुन्हा शाळा??? नको रे बाबा...


दोन मित्र एकाच वर्गात दुसर्‍यांदा नापास होतात.

पहिला : काय कटकट आहे ही. चल आपण आत्महत्या करू.

दूसरा : नको रे बाबा. नाहीतर पुढच्या जन्मी पुन्हा जूनियर के.जी. पासून सुरुवात करावी लागेल.

06 February 2012

अरण्या

एकदा अरुण कदम साहेब बँकेत पैसे जमा करायला गेले.

कॅशियर : तुमच्याकडच्या सगळ्या नोटा नकली आहेत.


अरुण कदम : असुदे कि वसाड्या. मी माझ्या खात्यात भरतोय. तुला काय करायचंय?


मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...