Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

06 April 2013

विनम्र पुणेकर?


एक आजोबा देवळात देवाच्या दर्शनासाठी जातात.
आपली छत्री ते तेथील झाडाखाली ठेवून देवदर्शन करून येतात.
परतताना त्यांना दिसते की एक व्यक्ती त्यांची छत्री घेऊन जात आहे.

आजोबा त्या व्यक्तीला विचारतात, “का हो, तुमचंच नाव साठे आहे का?
व्यक्ती : नाही. का?

आजोबा : त्याचं काय आहे? तुम्ही जी छत्री घेऊन जात आहात ती साठेंची आहे आणि ते नाव धारण करणारे सद्गृहस्थ मीच आहे.
                       तेव्हा ही छत्री तोंडातून एकही अक्षर न उच्चारता माझ्या स्वाधीन करावी व येथून आपल्या घरी मार्गस्थ व्हावे. पुन्हा अशी हरकत केल्यास असा अपमान केला जाईल की तोंड लपवण्यासाठी एक छत्री घेऊन फिरावे लागेल.

04 April 2013

सरदार का पुत्तर


एकदा एका माणसाने एका सरदारला पत्र लिहिलं.

त्यात लिहिलेलं होतं की “जर तू हुशार असशील तर १०० रुपये खालील पत्त्यावर पाठव. जर तू जास्त हुशार असशील तर ३०० रुपये पाठव आणि जर तू खूपच हुशार असशील तर ६०० रुपये पाठव.”

सरदारने मात्र त्या माणसाला १००० रुपयांची नोट पाठवली. त्या पत्रात सरदारने लिहिले की “मी सगळ्यांचा बाप आहे. मी अतिशहाणा आहे.

03 April 2013

दगाबाज चेहरे


वेड्यांच्या इस्पितळातील हे संभाषण...


एक कैदी (दुसर्‍यास) : एकसारखे दिसणारे चेहरे कधी दगा देतील सांगता येत नाही. एकदा एकजण मला अमिताभ बच्चन समजला.

दूसरा कैदी : अरे हो ना. मलापण एकदा एकजण राहुल गांधी समजला.

हे संभाषण ऐकत असलेला तिसरा कैदी : अरे हे तर काहीच नाही. मी जेव्हा या जेलमध्ये तिसर्‍यांदा आलो ना, तेव्हा जेलर म्हणाला...अरे देवा, तू पुन्हा आलास?

02 April 2013

ईथपर्यंत कसे आलात?


एका मोठ्या राजकीय नेत्याचे विमान अपघातात निधन होते.

काही दिवसांनी एका समाजसेवकाचे राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या धडकेने निधन होते.
हे दोघे स्वर्गात भेटतात.

राजकीय नेता : या या. आपल्यासारख्या समाजसेवकाची इथेही खूप गरज आहे. पण आपल्याला यायला एवढा उशीर का झाला?

समाजसेवक : त्याचं काय आहे...तुम्ही विमानाने आलात आणि आम्ही राज्य परिवहन महामंडळाच्या बसने.

16 March 2013

सच का सामना...

दक्षिण भारतातले लोक एवढे काळे का असतात माहितीये?

कारण,

ते कधीही फक्त SUN टीव्ही किंवा SURYA टीव्हीच बघत असतात, म्हणून.

भारताचा वर्तमानकाळ


इतिहास घडविला त्यांनी...
वर्तमान घडविताहेत हे...

एका शाळेत इन्सपेक्शन म्हणजे शिक्षण अधिकार्‍यांकडून विद्यार्थी, तेथील वातावरण, शिक्षणाची गुणवत्ता, शाळेची इमारत, शिक्षकांची गुणवत्ता आदी गोष्टींची पाहणी करण्यासाठी शासनाकडून पथक पाठविलं जातं.

एक अधिकारी एका मुलाला प्रश्न विचारतात.

अधिकारी : महात्मा गांधींचं संपूर्ण नाव काय?

मुलगा : राहुल गांधी.

अधिकारी हे उत्तर ऐकून शिक्षकांवर चिडतात.
शिक्षक आपली व्यथा मांडतात.

शिक्षक : अहो, माझा तीन महिन्यांचा थकलेला पगार मिळत नाही तोपर्यंत हेच "महात्मा" गांधी.

White collar दरोडेखोर


एका बँकेत दरोडा पडतो.

टकलू हैवानाची गॅंग बँक लुटते.

दरोडेखोर पैसा एका बॅगेत घालून पलायन करणार, तोच बँकेचा कॅशियर एका टकल्याचे पाय धरतो आणि त्याला विनवणी करतो.

कॅशियर : कृपा करून हे रजिस्टरपण घेऊन जा हो. यात माझ्याकडून दोन लाखांचा गफला झालाय.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...