Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

08 June 2013

बेवडा हॉट सीटवर

एकदा एक बेवडा “कोण होईल मराठी करोडपती” मालिकेत भाग घेतो.

त्याला सचिन खेडेकर एक प्रश्न विचारतात, “एक हजारासाठी हा प्रश्न.”

“भारतात सर्वात जास्त बर्फ कुठे पडतो? आणि पर्याय आहेत...”


बेवडा : थांबा, थांबा. पर्याय कसले देताय. उत्तर अगदी सोप्पं आहे. सकाळी ८ वाजण्यापूर्वी काश्मीरमध्ये आणि संध्याकाळी ८ नंतर विस्कीच्या बाटलीमध्ये.

निर्मलबाबा की जय !!!

भगवान श्रीकृष्ण : वत्सा, फळाची अपेक्षा न करता कर्म करीत रहा; म्हणजे तुझ्यावर परमेश्वराची कृपा होईल आणि यथावकाश योग्य ते फळही मिळेल.


निर्मलबाबा : मुला, लाल चटणीऐवजी हिरवी चटणी खात जा; म्हणजे तुला परमेश्वराची कृपा प्राप्त होईल.

ओये संता...संता ओये

संता एकदा आपल्या एका पायात सफेद तर दुसर्‍या पायात काळा बूट घालून शाळेत जातो.

शिक्षक : अरे, काय रे हे संता? जा घरी जाऊन बूट बदलून ये.


संता : त्याचा काहीच उपयोग नाही सर. कारण, घरी पण असलेच दोन बूट अजून आहेत.

जनता मूर्ख?

आपले एक भ्रष्टाचारी नेते पश्चिम महाराष्ट्रात भाषण ठोकीत असतात.

अहो, २० वर्षांपूर्वी एक फोन करायचा म्हटलं तर ६ रुपये लागायचे; आणि समोसा मात्र एका रुपयात मिळायचा.

आज मात्र उलटी परिस्थिती आहे.

आज समोसा ६ रुपयांना तर फोन १ रुपयापेक्षा कमी पैशांतसुद्धा करता येतो.

याचाच अर्थ, महागाई वाढलीय असा होत नाही बरं का. फक्त थोडी इकडची तिकडी झालीय.


विरोधी पक्षाला काही काम नाय म्हणून उगाच तुम्हाला वाटेल ती उदाहरणं देत बसतो बघा.

संशोधन म्हणजे काय?

जेव्हा आपण एखाद्या ठिकाणाहून किंवा मुळची एखाद्याची असलेली कल्पना चोरतो, तेव्हा तो कॉपीराईट कायद्याचा भंग ठरतो.


तर जेव्हा आपण अनेक ठिकाणांहून अशा अनेक कल्पना चोरतो, तेव्हा त्याला म्हणतात संशोधन.

19 May 2013

त्यांचं (ई)मान


२००९ साली सोनियांनी काय हुशारी केली बघा.

बहुमत मिळाल्यावर अनेकजण त्यांच्या विरोधात असूनही पुढारपणा करीत स्वत:ला पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून सांगू लागले.

मग सोनियांनी सगळ्यांना एका विमानात घातलं आणि म्हणाल्या, “चला आकाशातून आपली संसद कशी दिसते बघूया.

विमान हवेत उंच जाताच त्यात काहीतरी बिघाड झाला. एक दरवाजा उघडला जाऊन सगळे प्रवासी त्यातून बाहेर फेकले जाऊ लागले. पण या सगळ्या गोंधळात सुदैवाने सर्वांच्या हातात एक दोरखंड लागल्याने सगळे त्याला पकडून हवेत लटकू लागले.

एवढ्यात पायलटने घोषणा केली, “विमानाचा तोल बिघडतोय. पटकन कुणीतरी एकाने दोर सोडा.
या संधीचा फायदा घेऊन सोनिया म्हणल्या,ठीक है. मै मेरी अंतरात्मा का आवाज सुनकर यह त्याग करने को तैयार हू. तालिया...

मग काय?

सगळ्यांनी खुश होऊन टाळ्या वाजवल्या आणि अशाप्रकारे त्यांनी आपल्या अंतर्गत विरोधकांना “हात” दाखवला आणि तेव्हापासून आजपर्यंत जनतेला.

01 May 2013

मराठी दारुड्याची अस्मिता


एकदा तीन देशांचे दारुडे स्वर्गात भेटतात.

इजिप्शियन दारुडा खाली पृथ्वीवर बोट दाखवून म्हणतो,ती बघा, ती मोठ्ठी लाईन दिसते ना, ती आमच्या देशातली आणि जगातली सर्वात लांब नदी आहे."

चीनचा दारुडा : नाही रे, ती तर आमच्या देशातली आणि या जगातली सर्वांत मोठ्ठी आणि लांब भिंत आहे.

मराठी दारुडा : चल ए. ती तर महाराष्ट्रातली आणि या जगातली सर्वांत मोठ्ठी आणि लांब वाईन शॉपच्या बाहेरची दारूड्यांची लाईन आहे.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...