Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

12 August 2015

लाड

पुण्यात भलते लाड चालत नाहीत.

एक मुलगा बाबांना म्हणतो, “बाबा, बाबा, मला ब्लॅकबेरी नाहीतर अॅपल पाहिजे."


बाबा : नालायका, फणस आणलाय तो संपव आधी.


06 August 2015

विठ्ठलाला साकडे



आपल्या महाराष्ट्रात आणि देशात मुबलक पाऊस पडावा आणि शेतकरी जगावा, देशाची भरभराट व्हावी म्हणून एका गावाच्या समस्त गावकर्‍यांनी विठुरायाला साकडं घालायचं ठरवलं.

त्यासाठी गावातील विठुरायाच्या मंदिरातील पुजार्‍याने तयारी केली.

प्रार्थनेचा दिवस उजाडला.

सगळे गावकरी जमा झाले.

प्रार्थना म्हटली गेली.


आणि पुजार्‍याने सर्वांसमोर निवेदन केलं की,”प्रार्थना झालीच पण यातून एक गोष्ट पण समजली की आपला सर्वांचा माऊलींवर किती विश्वास आहे ते...माझ्याशिवाय तुमच्यापैकी कुणीही छत्री घेऊन आला नाही.

बजरंगी भाईजान


जर सलमान खानऐवजी भारतातली काही लोकं मुन्नीला सोडायला पाकिस्तानात गेली असती तर...

१. केजरीवाल गेले असते तर त्यांच्याबरोबर ते ६ कॅमेरामन आणि ४ वार्ताहरांना घेऊन गेले असते शिवाय सीमेवर पाकिस्तानी फौजेसमोर धरणे धरून बसले असते.

२. मोदी गेले असते तर मुन्नीला घेऊन चीन, बांग्लादेश, भुतान, नेपाळ, रशिया, जपान, अफगाणिस्तान आणि मग पाकिस्तानला गेले असते. मग मुन्नी आईकडे पोचल्यावर म्हणाली असती, “मित्रो, मै आ गई|

३.  राहुल गांधी गेले असते तर मुन्नीला म्हणाले असते, “माझ्या हाताची करंगळी पकडून चल नाहीतर हरवशील.”

४. रॉबर्ट वाड्रा गेले असते तर पाकिस्तान पुन्हा एकदा भारताचा भाग झाला असता.


५. अर्णब गोस्वामी गेले असते तर अर्धे पाकिस्तानी मुके आणि अर्धे बहिरे झाले असते.


येडा सरदार

एक सरदार त्याच्या मित्रासाठी झोपेचं औषध घ्यायला डॉक्टरांकडे जातो.

डॉक्टर : एक काम करा. हे घ्या औषध. आता एक पन्नास पैशांचं नाणं घ्या आणि त्यावर मावेल एवढं औषध आज रात्री त्याला द्या.

दुसर्‍या दिवशी सरदार घाबरत घाबरत डॉक्टरकडे आला.

डॉक्टर : काय झालं पाजी?

सरदार : काय सांगू डॉक्टर? रात्री मित्राला औषध दिलं पण त्याने तो कायमचाच झोपला.

डॉक्टर : मी सांगितलं तेवढं औषध नक्की दिलं होतंत ना?


सरदार : हो. फक्त पन्नास पैशांचं नाणं नव्हतं म्हणून मी पाच पैशांच्या नाण्याने त्याला १० वेळा ते दिलं.


प्रामाणिक पुणेकर(ही) असतात बरं का...

पुण्यातील एका देशी दारूच्या दुकानाबाहेर एक बोर्ड लावलेला होता.

“आमच्याइथे दारू पिणारा आयुष्यात हमखास लखपती होतोच होतो. *

*...जर तो आधी करोडपती असेल तर.



सूचना : वरील बोर्ड नीट वाचा, भिकार्‍यासारखे १० वेळा आम्ही कधी लखपती होणार म्हणून विचारायला येऊ नये. अपमान करण्यात येईल.


भागदौड भरी जिंदगी


आम्ही पण लहानपणी श्रीकृष्णासारखे सुंदर होतो,


पण


आयुष्याच्या पळापळीत,



आमचा पार भैरोबा झालाय...


05 August 2015

दोघांचही ऐका, लोकशाही आहे.


केजरीवाल म्हणतात,दिल्ली पोलिसांना आमच्या हाताखाली द्या, कसे सुधारतो त्यांना बघा फक्त.

आणि,


दुसरीकडे, दिल्ली पोलिसांचंपण केजरीवालांबद्दल हेच मत आहे.


मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...