Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

15 August 2014

वंदे मातरम


!!! भारत माता की जय !!!




सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


03 August 2014

धोका

हॉस्टलमध्ये राहणार्‍या दोन विद्यार्थ्यांमधील हा संवाद.

पहिला विद्यार्थी : अरे माझ्यासोबत फार मोठा धोका झाला.

दूसरा विद्यार्थी : का रे, काय झालं?


पहिला : काय सांगू, पप्पांकडे पुस्तकांसाठी पैसे मागितले तर त्यांनी पुस्तकंचं पाठवून दिली.



मच्छराचं घर

एकदा दोन मच्छर उडत उडत जात होते.

तेवढ्यात वाटेत त्यांना एक टकला माणूस जाताना दिसतो.
एक मच्छर त्या माणसाच्या टकलावर जाऊन बसतो.

दूसरा मच्छर त्याचं कौतुक करतो.

तो म्हणतो, “वा. काय मस्त घर शोधलंय.”


पहिला मच्छर : घर कसलं? आताशी प्लॉट घेतलाय.



देवाला धमकी

एक बेवडा गटारीच्या दिवशी फुल्ल टाईट होऊन चालला होता.

हलत-डुलत चाललेला असताना जोरात पाऊस चालू होतो.

बेवडा चिखलात पाय घसरून पडतो आणि तेवढ्यात वीज चमकते.


बेवडा : (घाबरून) हे महादेवा, मी चिखलात पडलो तर तू माझा फोटो काढून घेतलास? खबरदार माझ्या बायकोला दाखवला तर? मी गणपतीला किडनॅप करीन. 


कृतज्ञ न्हावी

एकदा एक बौद्ध भिक्षू न्हाव्याकडे केस कापायला जातो.
न्हावी त्याचा चमन गोटा करून देतो. भिक्षू त्याला पैसे देतो परंतु न्हावी ते नाकारतो.
न्हावी म्हणतो, “तुम्ही सद्गृहस्थ आहात. तुम्ही देवाचे काम करता. मी तुमच्याकडून पैसे घेऊ शकत नाही.”
दुसर्‍या दिवशी जेव्हा न्हावी दुकानात येतो, तेव्हा त्याला एक अनामिक व्यक्ती बौद्धांच्या धार्मिक ग्रंथांच्या २१ प्रती भेट म्हणून देऊन जातो.

मग न्हाव्याकडे एक पोलीस केस कापायला येतो आणि केस कापून झाल्यावर “तुम्ही जनतेला संरक्षण देता असे म्हणून पोलिसाने देऊ केलेले पैसे नाकारतो.”
दुसर्‍या दिवशी जेव्हा न्हावी दुकानात येतो, तेव्हा त्याला एक अनामिक व्यक्ती मिठाई आणि खमंग जेवणाची थाळी देऊन जाते.

मग न्हाव्याकडे एक वकील केस कापायला येतो. केस कापून झाल्यावर “तुम्ही न्यायदानाचे पुण्यवान काम करता तेव्हा मी तुमच्याकडून पैसे घेऊ शकत नाही असे म्हणून वकिलाने देऊ केलेले पैसे नाकारतो.”


दुसर्‍या दिवशी तो वकील आपल्या कोर्टातल्या सगळ्या वकिलांना केस कापायला घेऊन जातो.



मित्राला बंडूची मदत

मास्तर : मोरया, तू काल शाळेला का आला नाहीस?

मोरया : मास्तर, मी काल रात्री स्वप्नात अमेरिकेला गेलो होतो.

मास्तर : काय कार्टं आहे, स्वप्नात अमेरिकेला गेलं म्हणून शाळा बुडवली. तुला ना चांगला बडवायला पाहिजे.

(मग बंडूकडे बघत) बंडू, तू का बरं आला नाहीस काल?


बंडू : मास्तर, मी मोरयाला विमानतळावर सोडवायला गेलो होतो.

02 August 2014

निशाणा...तुला दिसला ना

एक खगोलशास्रज्ञ आकाशाकडे दुर्बिण लावून बसला होता.

संता तिथून जात असताना त्याला हे दृश्य दिसलं.

तेवढ्यात आकाशातून एक उल्का दूर डोंगरावर पडताना दिसते.


संता : वा, वा. काय अचूक नेम आहे तुमचा.



मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...