Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

05 April 2012

सुखी आयुष्याचा मंत्र...छू मंतर...


तुम्ही फारच वैतागलेले आहात का?

रोज सकाळी उशिरा उठता म्हणून आई-वडिलांची बोलणी खावी लागतात का?

प्रवासातपण कुणी अतिशहाणे भेटतात का?
ऑफिसमध्ये गेल्यावर बॉसची कटकट असते का?

सुट्टीच्या दिवशी लांबचे नातेवाईक उगाचच काहीतरी कामानिमित्त तुमच्या घरी येऊन तुम्हाला कामाला लावून जातात का?

ठीक आहे..
मग या सर्वांतून कसे सुटाल?

एकच काम करा...लग्न करा.

म्हणजे तुम्हाला तुमच्या या सगळ्या समस्या अगदीच फालतू वाटतील आणि तुम्ही अतिशय आनंदाने त्यांना सामोरे जाल आणि आई-वडील, नातेवाईक, बॉस, इतर व्यक्तींशी अतिशय प्रेमाने वागताल.

03 April 2012

काम एवढुसं आणि मेहनत मात्र केवढी?

संताचा ट्रक रस्त्यात बंद पडलेला असतो.

संता जवळच्या गॅरेजमध्ये जातो आणि त्याचा ट्रक ओढून नेण्यासाठी दूसरा ट्रक घेऊन येतो.

त्याच्या ट्रकला तो जाड कासरा बांधून तो ह्या ट्रकला बांधून त्याचा ट्रक ओढून नेण्याचा प्रयत्न करत असतो.

तेवढ्यात तिकडून बंता येतो.

संताचं हे थेर बघून तो पोट धरून जमिनीवर लोळून लोळून हसू लागतो.

चिडलेला संता त्याच्याकडे येऊन त्याला विचारतो, “काय रे काय झालं हसायला?

बंता : हा हा हा हा...एवढीशी दोरी ओढून न्यायला दोन दोन ट्रक...हा हा हा हा !!!

राष्ट्राचा सारीपाट


सरकार आणि सरदार यांच्यात काय फरक आहे? सांगा पाहू...
सरकार हे चालवावे लागते,
तर सरदार कायम चालूच असतो.
आता,
जर सरदार सरकार चालवू लागला तर???

सरदारला वाटेल की तोच सरकार चालवत आहे, पण प्रत्यक्षात दुसराच कुणीतरी ते चालवत असेल...

02 April 2012

महात्मा गांधींचं स्वप्न...आणि सत्य.


एक दिवस महात्मा गांधी सोनिया गांधींच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, “मी मरताना कॉंग्रेसला नम्रपणा, ईमानदारी, टोपी, चष्मा आणि माझी काठी दिली होती. कुठे आहे ते सगळं?

सोनिया गांधी :sss sss ब...टोपी तर राहुल लोकांना घालतोय, नम्रपणा मी स्वत:कडे ठेवलाय, चष्मा मनमोहनसिंगांना दिलाय, ईमानदारी स्विस बँकेत सुरक्षित आहे आणि आपली काठी “आम आदमी”च्या सेवेत २४ x ७ कार्यरत आहे.

मला शिकायचंय मास्तर...


बंड्या : मास्तर, मला संस्कृत शिकवा.
मास्तर : का रे, आपल्या शाळेत संस्कृत हा विषयच नसताना तुला संस्कृत शिकावसं का वाटतंय?
बंड्या : कारण ती देवांची भाषा आहे आणि मला स्वर्गात गेल्यावर ती फार उपयोगी पडेल म्हणून.
मास्तर : ए गुंडाड माणसा, तुला कशावरून वाटतंय तुला स्वर्ग मिळेल म्हणून? ठीक आहे असू दे, पण समजा नरक मिळाला तर?
बंड्या : ssss य मास्तर, त्याची काय पण काळजी नाय आपल्याला. शिव्या देण्यात आपण डिग्री मिळवलेली हाय.

01 April 2012

प्रश्नाचं उत्तर दे बंड्या...


गुरुजी : बंड्या, सांग बरं A, B, C, D मध्ये किती अक्षरे असतात?

बंड्या : ४

गुरुजी : अरे मूर्खा, मी फक्त A, B, C, आणि D ही चारच अक्षरं नाही विचारली. नीट सांग.

बंड्या : (थोडा विचार करून) ५२.

गुरुजी : आं...कसं काय?

बंड्या : मोठी २६ (Capital) आणि लहान २६ (Small) अक्षरे.

मस्तीखोर उंदीर


एक हत्ती हुक्का ओढत बसलेला असतो.

तेवढ्यात एक उंदीर त्याच्याजवळ येतो.

उंदीर : महाराज, आपल्याला असं व्यसनी होणं शोभतं का? टाकून द्या तो हुक्का अन चला माझ्याबरोबर मी तुम्हाला दाखवतो आपलं जंगल किती सुंदर आहे ते?

हत्ती काही न बोलता त्याच्याबरोबर चालू लागतो. बर्‍यापैकी जंगल फिरून झाल्यावर ते सिंहाच्या गुहेजवळ येतात.

सिंह पण आरामात सिगारेट फुंकत बसलेला असतो. तोसुद्धा सिंहाला असंच सांगून त्याच्याबरोबर यायला सांगतो.

सिंह आपल्या तोंडातली सिगारेट खाली टाकतो आणि पायाखाली विझवतो. उंदराजवळ जाऊन त्याच्या दोन मुस्कटात लगावतो.

हत्ती : महाराज कशाला मारता या बिचार्‍याला?
सिंह : मागच्या वेळेस मला ह्याने असंच काही-बाही सांगून दोन तास जंगलात फिरवलं.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...