Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

03 February 2013

चूकच झाली...


एक पुणेकर म्हणजे जोशीकाका आणि एक नागपुरकर काका शेजारी शेजारी राहत असतात, पुण्यात.
एक दिवस नागपूरकर काकांच्या घरी पाहुणे येतात.

ते चुकून चपला जोशीकाकांच्या दरवाजासमोर काढतात.

हे नवे लोक असल्याने एकदम चपला भिरकावून देण्यापेक्षा यांना पुण्याचे नियम सांगावे म्हणून जोशीकाका नागपूरकर काकांच्या घरी तावातावाने जातात.

जोशीकाका : हे बघा. तुमच्या पाहुण्यांनी आमच्या घरासमोर चपला काढल्यात. त्या आधी उचला नाहीतर त्या मिळवण्यासाठी कचरा-डेपोत जावे लागेल आणि पुन्हा असले नखरे आम्ही खपवून घेणार नाही. तुम्हाला चांगला सज्जन समजत होतो मी आणि तुम्हाला एवढं कळत नाही?

नागपूरकर काका : अहो जोशी, मीपण तुम्हाला चांगला सज्जनच समजत होतो.

जोशीकाका : हो. तुम्ही बरोबरच समजत होतात. चूक माझीच झाली.

31 January 2013

दोन गंडलेले सरदार


पहिला सरदार : तुझा फोन नंबर सांग.

दूसरा सरदार : त्या टेलिफोन डिरेक्टरीत बघ.

पहिला सरदार : तुझं नाव सांग.

दूसरा सरदार : अरे मूर्खा, त्या डिरेक्टरीतच आहे माझ्या फोन नंबरसमोर.

30 January 2013

पुणेकराच्या वाटेला जाता?


दोन नागपूरकर एकदा एका पुणेकराच्या घरासमोरून जाताना आपापसांत पुटपुटतात, “आपलं नागपूर म्हणजे कसं सुटसुटीत आणि चकाचक. इथं राव गटाराचा केवढा वास येतोय. साधं फिनेल नाही टाकता येत ह्या लोकांना.”

तेवढ्यात जोशी हे ऐकतात आणि आता...

जोशी : का हो? तुम्हाला कसं कळलं वास येतोय ते?

नागपूरकर : नाकाने.

जोशी : हो का? अरे हुकलेल्या, मग आधी थोबाड वर करून स्वत:च्या नाकात फिनेल मार.

का झोपू शकत नाही???


साठे सर वर्गात शिकवत असतात.

एका मुलाचे डोळे झाकपाक झाकपाक करीत मिणमिणत्या मेणबत्तीप्रमाणे त्यांच्याकडे बघत असतात.

साठे सर (त्या मुलाला) : का रे? झोपतोस? माझ्या लेक्चरला तू झोपू शकत नाहीस.

विद्यार्थी : झोपू शकतो सर. तुम्ही फक्त जोरा-जोरात ओरडून शिकवू नका.

सरदार आणि वाघ


सरदारजीला एकदा प्राणिसंग्रहालयात नोकरी मिळते.

सरदार एके दिवशी वाघाच्या पिंजर्‍याला कुलूपच लावत नाही. तसाच मोकळा सोडून येतो.

तिथल्या अधिकार्‍याला हे समजतं तेव्हा तो सरदारला विचारतो, का रे, तुला एवढं कळत नाही का? कुलूप का नाही लावलंस?

सरदार : अहो साहेब, एवढ्या हिंस्र प्राण्याला कोण कशाला चोरी करून नेईल?

काळजी


नवरा सकाळी सकाळी बगीच्यात उन्हाळा जाऊन मस्त पेपर वाचत बसलेला असतो.

बायको चहा आणून समोर येऊन बसते.

बायको : अहो, काल मी डॉक्टरांकडे गेले होते.

नवरा (जरा वैतागून) : अच्छा, कसे आहेत आपले डॉक्टर? तब्येत वगैरे बरी आहे ना त्यांची?

डरपोक??? छे...छे...!!!


बायको माहेराहून आल्यावर नवरा बायकोला ती माहेरी गेल्यावर घडलेली घटना सांगतो.

नवरा : अगं, परवादिवशी काय झाले माहितीये? आपल्याकडे चोर आले होते. चांगले ३-४ जण होते. मी एकटा. त्यांनी मला धरले आणि खूप मारले.

बायको : मग तुम्ही आरडा-ओरडा नाही केलात?

नवरा : छे, छे...बायकांसारखा आरडा-ओरडा करायला मी काय डरपोक नाहीये.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...