Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

19 May 2013

त्यांचं (ई)मान


२००९ साली सोनियांनी काय हुशारी केली बघा.

बहुमत मिळाल्यावर अनेकजण त्यांच्या विरोधात असूनही पुढारपणा करीत स्वत:ला पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून सांगू लागले.

मग सोनियांनी सगळ्यांना एका विमानात घातलं आणि म्हणाल्या, “चला आकाशातून आपली संसद कशी दिसते बघूया.

विमान हवेत उंच जाताच त्यात काहीतरी बिघाड झाला. एक दरवाजा उघडला जाऊन सगळे प्रवासी त्यातून बाहेर फेकले जाऊ लागले. पण या सगळ्या गोंधळात सुदैवाने सर्वांच्या हातात एक दोरखंड लागल्याने सगळे त्याला पकडून हवेत लटकू लागले.

एवढ्यात पायलटने घोषणा केली, “विमानाचा तोल बिघडतोय. पटकन कुणीतरी एकाने दोर सोडा.
या संधीचा फायदा घेऊन सोनिया म्हणल्या,ठीक है. मै मेरी अंतरात्मा का आवाज सुनकर यह त्याग करने को तैयार हू. तालिया...

मग काय?

सगळ्यांनी खुश होऊन टाळ्या वाजवल्या आणि अशाप्रकारे त्यांनी आपल्या अंतर्गत विरोधकांना “हात” दाखवला आणि तेव्हापासून आजपर्यंत जनतेला.

01 May 2013

मराठी दारुड्याची अस्मिता


एकदा तीन देशांचे दारुडे स्वर्गात भेटतात.

इजिप्शियन दारुडा खाली पृथ्वीवर बोट दाखवून म्हणतो,ती बघा, ती मोठ्ठी लाईन दिसते ना, ती आमच्या देशातली आणि जगातली सर्वात लांब नदी आहे."

चीनचा दारुडा : नाही रे, ती तर आमच्या देशातली आणि या जगातली सर्वांत मोठ्ठी आणि लांब भिंत आहे.

मराठी दारुडा : चल ए. ती तर महाराष्ट्रातली आणि या जगातली सर्वांत मोठ्ठी आणि लांब वाईन शॉपच्या बाहेरची दारूड्यांची लाईन आहे.

30 April 2013

रजनी


एकदा बास्केटबॉलचा एक खेळाडू रजनीकांतला म्हणतो, “मी बास्केटबॉल हाताच्या एका बोटावर दोन तास गोल फिरवू शकतो. तुला येतं का?

रजनीकांत : यन्ना रास्कला, माइंड इट. तुला काय वाटतं, ही पृथ्वी काय मनाने गोलगोल फिरते?

29 April 2013

योग्यवेळी योग्य माणूस भेटतो तेव्हा



रुग्ण : डॉक्टरसाहेब, मी खूप आजारी आहे हो. इतका की मला आता मरायचं आहे डॉक्टरसाहेब.

डॉक्टर : काही काळजी करू नका. तुम्ही योग्य ठिकाणी आलात.


28 April 2013

दारुड्याचं आव्हान


एक दारुड्या गटारी अमावास्येला फुल्ल टाईट होऊन रस्त्याच्या कडेकडेने हलत-डुलत चालला होता.
दारूच्या नशेत तो काहीही बरळायचा.

तो असाच म्हणतो, “च्यायला मला दारूला कुणी बंदी घातली या महाराष्ट्रात, तर मी महाराष्ट्र त्या अरबी का फिरबी समुद्रात बुडवीन.”

त्याचं हे असलं वागणं पाहून तिथून जाणार्‍या एका हवालदाराने त्याला हटकलं.

हवालदार :  ए, आधी स्वत:ला सांभाळ. कुणी ऐकलं तर मरेस्तोवर मार खाशील.
दारुड्या : का म्हणून? मला दारू प्यायला बंदी घातली तर अख्खा महाराष्ट्र गणपतीसारखा तीनवेळा पाण्यात बुडवून विसर्जन करीन.

हवालदार : काय येडा समजलास मला. दारू पिऊन काहीही बरळू नकोस. फटाके फोडू का?
दारुड्या : मी दारू प्यायलोय? बरं, मग उद्या सकाळी फेकतो त्याला, या दारूची शप्पथ.

हवालदार : तसं मला लिहून दे. उद्या उतरल्यावर नाही म्हणशील.

दारुड्या तसं लिहून देतो की, हवालदार श्री. चंद्रकांत पावट्याला दिलेल्या वचनाप्रमाणे मी अख्खा महाराष्ट्र अरबी समुद्रात फेकीन. तसे नाही केल्यास मी दारू पिऊन रस्त्यावर गोंधळ घालण्यासाठी जी काही शिक्षा असेल ती भोगण्यास पात्र राहीन.

दुसर्‍या दिवशी हवालदार त्याला इन्स्पेक्टरच्या पुढे उभा करतो आणि रात्री झालेली हकीकत सांगतो.

इन्स्पेक्टर : काय रे? जीभ जास्त वळवळते काय तुझी? चल आता फेक बघू महाराष्ट्र त्या अरबी समुद्रात.

दारुड्या : ठीक आहे साहेब, आत्ता फेकतो. फक्त तो उचलून माझ्या खांद्यावर ठेवा तुम्ही.

14 April 2013

आत्मक्लेश


महा(न)राष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी आत्मक्लेश म्हणून कराडला स्व.मा.मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या समाधीसमोर उपोषण सुरू केले.

त्यांनी दिवसभर उपोषण तर केले. पण संध्याकाळी मात्र त्यांना भुकेने राहवेना.

जसजशी संध्याकाळ होऊ लागली तसे ते आजूबाजूच्या मंडळींना एकच प्रश्न विचारू लागले,सूर्यास्त झाला का?

बाजूची मंडळी : नाही अजून.

पुन्हा थोड्या वेळाने..."सूर्यास्त झाला का?”



“नाही अजून.”

पुन्हा थोड्या वेळाने..."सूर्यास्त झाला का?”



“नाही अजून.”

“च्यायला, अवघडंच झालं. लवकर सूर्यास्त नाय झाला तर सूर्याबरोबर माझापण अस्त व्हायचा.”

हाजमोला...


एक भिकारी एका पुणेकराकडे भीक मागायला येतो.
भिकारी भलताच प्रामाणिक असतो.

भिकारी : साहेब, आपल्या शेजार्‍याने मला पोटभर जेवू घातलंय. तुम्हीही काहीतरी खाऊ घाला ना.

पुणेकर : हा घे, हाजमोला.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...