Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

23 July 2011

भाकीत (?)

१३ जुलै, २०११ ला मुंबईत खाऊगल्ली, झवेरी बाजार आणि ओपेरा हाऊस इथे जे बॉम्बस्फोट झाले, त्यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान झरदारी आणि आपले भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यामध्ये झालेलं हे संभाषन.

झरदारी : हॅलो, नमस्कार मनमोहनसिंगजी. मुंबईत आत्ताच खाऊगल्ली, झवेरी बाजार आणि ओपेरा हाऊस इथे जे बॉम्बस्फोट झाले, त्याबद्दल मला खूप दु:ख वाटते. अनेक निरपराध माणसे यात नाहक मारली गेली आणि वित्तहानीसुद्धा झाली. पण मला इथे आवर्जून एक खुलासा करावासा वाटतोय तो म्हणजे, याहीवेळी तुमची संशयाची सुई आमच्याकडे असेल; परंतु आमचा मात्र याच्याशी काहीही संबंध नाहीये.

मनमोहनसिंग : अहो, कसले बॉम्बस्फोट? कसली वित्तहानी? कसला खुलासा?

झरदारी : (डोकं खाजवत, गडबडून) तुमच्या घड्याळात किती वाजलेत?

मनमोहनसिंग : ६ वाजून १५ मिनिटे.

झरदारी : अरे देवा...माझ्या घड्याळात ६ वाजून ४५ मिनिटे झालेली आहेत. आमचं घड्याळ तुमच्यापेक्षा ३० मिनिटे लवकर आहे, हे मी विसरलोच होतो. माफ करा हं ! त्यामुळेच मी तुम्हाला चुकून अर्धा तास अगोदर फोन केला.



22 July 2011

खोड मोडली

सदाशिव पेठेत राहणार्‍या एका पुणेकराला एका रिक्षाचालकाकडून वाईट अनुभव येतो. जादा पैसे मागणार्‍या ह्याची जमल्यास खोड मोडायची म्हणून तो या रिक्षावाल्याचा चेहरा आणि रिक्षाचा नंबर लक्षात ठेवतो.

काही दिवसांनी हे पुणेकर आपल्या कुटुंबासमवेत फिरायला बाहेरगावी जात असतात.
पुणे स्टेशनपर्यंत रिक्षानेच जावे म्हणून हे रिक्षाला हाक मारतात. तर हा नडलेला रिक्षावालाच समोर येतो.

पुणेकर : दशभुजा गणपतीला जाणार का?

रिक्षावाला : हो, जाणार ना. बसा की.

पुणेकर : मग येताना माझ्यासाठी प्रसाद घेऊन या.

असं म्हणून ते स्मितहास्य करत दुसर्‍या रिक्षात बसून निघून जातात.



21 July 2011

वा रे डॉक्टर...

रुग्ण : डॉक्टर, मला सर्दी झाली आहे. काहीतरी औषध द्या.

डॉक्टर : एक काम करा, घरी जा. थंड पाण्याने आंघोळ करा आणि अंग न पुसताच झोपी जा.

रुग्ण : अहो, तसं केलं तर न्यूमोनिया होईल ना मला.

डॉक्टर : हो. मी तेच तर सांगतोय तुम्हाला. मला न्यूमोनियावर औषध माहीत आहे, सर्दीवर नाही; म्हणूनच तर.



20 July 2011

लय शहाणा...




पुण्यातील सदाशिव पेठेत राहणार्‍या एका पुणेकरासोबत नागपूरकराची काही कारणावरून बाचाबाची होते.

नागपुर्‍या : अहो, तुम्हाला माहीत नाही...मी उडत्या पक्षांचे पाय मोजणारा माणूस आहे.

पुणेकर : ए येडया...मग त्यात काय एवढं? शेंबड्या पोरालाही माहीत असतं की पक्षाला दोनच पाय असतात ते.




19 July 2011

देवाचंच अपहरण

एक छोटा मुलगा एका चित्रपटात पाहतो की, त्यातल्या एका लहान मुलाला काही गुंड पळवून नेतात आणि त्याच्या आई-वडिलांना पैसे मागतात. मग आई-वडील पैसे देऊन आपल्या मुलाची सुटका करून घेतात.

हा पण मग अशीच भन्नाट युक्ती वापरुन सायकल मिळवायची असं ठरवतो.

तो शंकराच्या देवळात जातो आणि प्रार्थना करतो, "हे महादेवा, मला एक सायकल दे."

तो १ दिवस वाट पाहतो, पण सायकल काही मिळत नाही. मग दुसर्‍या दिवशी पुन्हा देवळात जातो.

आता मात्र तो देवळातली गणपतीची मूर्ती उचलून घेऊन घरी येतो.

देवळातून बाहेर पडण्यापूर्वी मात्र तो एक चिठ्ठी शंकराच्या पुढे ठेवून येतो.

ती अशी...

"जर तुला तुझा मुलगा सुरक्षित हवा असेल, तर उद्या सायकल घेऊन देवळाच्या मागे ये."

17 July 2011

बदला

एक मुंगी रिक्षाने प्रवास करत असते.

रिक्षावाला : मॅडम तुमचा पाय आतमध्ये घ्या.

मुंगी : नाही हो. मला जर रस्त्यात हत्ती भेटला ना, तर एक जोरदार लाथ घालायची आहे त्याच्या केपटात; काल मला डोळा मारून गेला तो.

15 July 2011

मिळतेजुळते शब्द





शिक्षक : मुलांनो मी आता जे शब्द सांगतो आहे, त्याच्याशी मिळतेजुळते तीन शब्द सांगा पाहू. आयकर, विक्रीकर,   भूमिकर.

बंडू : सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर.



मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...