Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

28 April 2012

सरदारजीला कोणत्या दिवशी हसवायचंय?


तुम्हाला सरदारजीला कोणत्या दिवशी हसवायचंय?

कधी?

रविवारी?

मग एक काम करा...

त्याला

सोमवारी एखादा विनोद सांगा, या माझ्या वेबसाईटवरचा...

27 April 2012

भूत उतरवा...मारवाडी स्टाइलने


एक दिवस मारवाड्याच्या मुलाच्या अंगात भूत शिरतं.

मारवाडयाप्रमाणेच त्याच्या मुलगा.

मग दोन दिवसांनी ते भूत एका मांत्रिकाकडे जातं
आणि
हातापाया पडत म्हणतं, “अहो मांत्रिकबाबा, मला ह्या कंजूस मारवाड्याच्या शरीरातून लवकर बाहेर काढा नाहीतर मी उपाशी राहून राहून मरून जाईल हो.”

कुत्र्याला दिली शिक्षा...


बंड्या : पप्पा, पप्पा, आपल्या मोत्याने माझ्या वहीची पानं फाडून टाकली.

पप्पा : थांब चांगलीच अद्दल घडवतो त्याला.

बंड्या : जाउद्या, मी त्याला आत्ताच चांगली शिक्षा दिलीय.

पप्पा : काय रे काय केलंस?

बंड्या : मी त्याला वाटीत दूध ठेवलं आणि त्याने थोडंस पितो न पितो तोच मी वाटी घेऊन त्यातलं दूध पिऊन टाकलं.

26 April 2012

छत्रीला भोक कशासाठी?


सरदार बाजारात जातो आणि छत्रीवाल्याकडुन २०० रुपयांना एक नवीन छत्री विकत घेतो.

तो छत्रीवाल्याकडून टोकदार दाभण घेऊन लगेच तिला एक बर्‍यापैकी मोठ्ठं भोक पाडतो.

छत्रीवाला गोंधळून जातो. तो सरदारजीला असं करण्याचं कारण विचारतो.

सरदारजी : अबे मूर्ख माणसा, पाऊस पडायचा थांबलाय हे कळायला नको? पाऊस थांबूनसुद्धा छत्री उघडून रस्त्याने चाललास तर लोक तुला मुर्खात नाही का काढणार?

हरवलेली चप्पल शोधायचीय?


एकदा एक सरदार गुरुद्वारात पाया पडून आपल्या एका मित्राबरोबर मारुतीच्या मंदिरात दर्शनासाठी जातो.

दर्शन घेऊन बाहेर येतो आणि बघतो तर काय?

त्याची चप्पल चोरीला गेलेली असते.
सरदार रागाने लालबुंद होऊन थेट स्मशानात जाऊन बसतो.

सरदारचा मित्र : जाऊ दे यार. एवढं मनाला कशाला लावून घेतो. नवी चप्पल घेऊन टाक. नाहीतरी ती चप्पल काय तू मेल्यावर वर घेऊन जाणार होतास काय?

सरदार : नाही ना. म्हणूनच तर इथे आलोय. त्या चप्पलचोराचा इथं स्मशानात नंबर लागेलंच की. जाऊन जाऊन कुठे जाईल तो. त्याचीच वाट बघत बसलोय.

25 April 2012

जड खिसा...


सरदार एक दिवस एक दगड खिशात घालून चाललेला असतो.

त्याचा मित्र विचारतो, “हा काय मूर्खपणाय? खिशात दगड घेऊन का हिंडतोयस?”

सरदार : अरे मूर्खा, तुला माहीत नाही का? आजकाल ज्याचा खिसा जड असतो, त्याचीच चलती असते.

21 April 2012

न थकण्याचं रहस्य…


हॉस्टलवर एक मुलगा कधीही बघावं तेव्हा अतिशय उत्साहात असतो. चेहर्‍यावर कधीच थकल्याचे भाव नसायचे.

पण एक दिवस त्याचा एक मित्र झोपलेला पाहून विचारती, “काय रे, तू तर कधीच थकत नाहीस ना. मग आता कसा काय झोपलाय?

मुलगा : न थकण्याचं तेच तर रहस्य आहे...

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...