Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

30 September 2010

बी.पी.


नाडकर्णी : अहो कुलकर्णी, मला डॉक्टर काल सांगत होते, की माझं बी.पी. वाढलय. हे बी.पी. म्हणजे काय हो ?




कुलकर्णी : बावळटपणा !

आठवण



“बाबा, बाबा, आज संध्याकाळी सूर्यास्त पहायला आपल्याला डोंगरावर जायचे आहे ना, मग लवकर या.” बंड्याने आपल्या वडिलांना आठवण करून दिली.


तेव्हा बंड्याचे बाबा त्याला म्हणाले, “अरे बाळा, आज मला लवकर यायला जमणार नाही, उद्या सकाळी आपण नक्की जाऊयात.”

कॅलेंडर


बंड्या : काका, मला एक कॅलेंडर द्या ना.
दुकानदार : कोणतं कॅलेंडर हवय तुला ?
बंड्या : ज्या कॅलेंडरमध्ये सगळ्यात जास्त सुट्ट्या असतील ना, असं.
     

करिअर



सुरेश : अरे जयदीप, तु मोठा झाल्यावर काय बनणार ?

जयदीप : मी जनावरांचा डॉक्टर बनणार.

सुरेश : अरे, पण तुला जनावरांचाच डॉक्टर का बनायचं आहे ?

जयदीप : कारण, जनावरं उलट फिरून तक्रार करत नाहीत.

 

प्रेमाची किंमत


लैला ही मजनूच्या प्रेमात आकंठ बुडाली होती.
पण मजनू मात्र व्यवहारी होता.
त्याच्या या व्यवहारीपणामुळेच दोघांचे भांडण झाले.

लैला रडत रडत म्हणाली, प्रेम कधीच विक घेता येत नाही.

मजनू : हो, पण तरीही ते महागात पडू शकतं.

प्रेम

लैला : तुझे माझ्यावर किती प्रेम आहे रे ?

मजनू : शाहजानचे मुमताजवर होते ना, तितके.

लैला : मग तु माझ्यासाठी ताजमहाल कधी बांधशील ?

मजनू : हो, प्लॉट घेऊन ठेवला आहे, आता तुझ्या मरण्याचीच वाट पाहतोय.

28 September 2010

चोरी

शेजारी : अहो भटजी महोदय, तुमच्याकडे काल चोरी झाली. तरी तुम्ही पोलिसांकडे तक्रार का नाही केलीत. तुम्ही नेमकी कशाची वाट पाहत आहात ?


भटजी : मुहूर्ताची.

हेयर कट

गिर्हातईक : हेयर कटला किती पैसे ?

केशकर्तक : तीस रुपये.

गिर्हातईक : आणि शेव्हसाठी ?

केशकर्तक : पंधरा रुपये.

गिर्हातईक : ठीक आहे, माझ्या डोक्याचं शेव्ह कर.

डबलसीट

एका वेड्यांच्या इस्पितळात सारे वेडे आपण सायकल चालवत आहोत, असे समजून इकडेतिकडे पळत असतात.

एक वेडा मात्र शांतपणे बसलेला असतो.

डॉक्टर त्याच्याकडे जातात आणि विचारतात, “का रे, तु का नाही सायकल चालवत ?”

वेडा म्हणतो, “काय पण हो मूर्खपणा हा तुमचा, तुम्हाला दिसत नाही का मी डबलसीट बसलोय ते.”

कान

शिक्षक : बंड्या, एखादी अशी वस्तु सांग, की जी तु पाहू शकतोस पण पकडू शकत नाहीस.

बंड्या : सर, तुमचा कान.

कॉपी

बाबा : अरे बंडू बाळा, तु तर सगळ्या विषयांत नापास झालास. हे काय बरं.

बंड्या : मग आता तरी खात्री पटली ना तुमची, की मी या परीक्षेत बिलकुल कॉपी केलेली नाहीय म्हणून.

१ ग्लास पाणी

बंड्या : बाबा, १ ग्लास पाणी द्या ना.

बाबा : स्वत: उठून घे.

बंड्या : प्लीज द्या ना बाबा.

बाबा : आता थोबाडीत मारीन तुझ्या !

बंड्या : बरं, थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आणा.

साखळी

डॉक्टर : अरे, तु तुझ्या गळ्यातील साखळी का ओढत आहेस ?

वेडा : काय करू डॉक्टर, सकाळपासून साखळी ओढत आहे, पण गाडी काही थांबतच नाहीय.

रंगकाम

दोन वेडे विमानतळावर जातात.

पहिला वेडा : काय रे, या मोठ्या विमानाला रंग कसा देतात ?

दूसरा वेडा : अरे, विमान जेव्हा आकाशात जातं, तेव्हा ते छोट होतं. त्यावेळीच त्याला रंग देऊन टाकतात.

फायनल

पती : अगं, कुठं चाललीस ?

पत्नी : अहो, शेजार्यांमशी भांडायला.

पती : पण कालच भांडून झालं ना ? तेवढं पुरेसं नाही का ?

पत्नी : हो, पण काल सेमी-फायनल होती. आज फायनल आहे.

म्हणी

शिक्षक वर्गातील मुलांना म्हणी पूर्ण करायला शिकवतात.

शिक्षक : बंड्या, आता ही म्हण पूर्ण कर बघू, ‘मनी वसे तेथे......’

बंड्या : मनी वसे तेथे उंदीर अजिबात नसे.

कॉपी

दोन मुलांना परीक्षा हॉलच्या बाहेर आपापसांत भांडताना शिक्षिकेनं पाहिले.

शिक्षिका : तुम्ही का भांडताय ?

बंड्या : बाई, हयानं गणिताच्या पेपरमध्ये काहीही लिहिलं नाही.

शिक्षिका : ठीक आहे, पण मग तु त्याच्याशी का भांडतो आहेस ?

वास

“घरात एवढी सफरचंद आणली होत, पण मला एकही मिळालं नाही. अगदी वासालासुद्धा नाही.” आजीने तक्रारीच्या सुरात म्हटले.

बंड्या : आजी, माझं हे सफरचंद तु घे, आणि वास घेऊन परत दे.

पाकीटमाराचा पाठलाग

ओंकार : चोर माझं पाकीट घेऊन पळाला.

रमेश : अरे, तु तर तरबेज धावपटू आहेस. का नाही पकडलस त्याला.

ओंकार : मी माझ्या परीने प्रयत्न केला. मी धावत त्याच्यापुढेही गेलो, पण मागे वळून पाहतो तर चोर गायब.

चुकीची तारीफ

फ्रेंच तत्वज्ञानी व्होल्टेयरचा एक मित्र त्यांना भेटला.

त्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मधेच तो त्यांना म्हटला, “मला एक कळत नाही, की तु त्या मोंसीयर वर्नेबद्दल नेहमीच चांगलं बोलत असतोस. पण तो मात्र जिथं संधी मिळेल तिथं तुझ्याबद्दल वाईटच बोलतो.”

त्यावर व्होल्टेयर बोलला, “कदाचित आम्ही दोघेही चुकीचे बोलत असू.”

बैल


एका गावात वाघाने उच्छाद मांडला होता. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी शिकार्‍याला बोलावण्यात आलं.
शिकारी : आज रात्रीच मी त्या वाघाचा बंदोबस्त करून टाकतो. मला गाईचं कातड आणून द्या, ते पांघरूण मी जंगलात जातो. गाय आहे असं समजून वाघ धावत येईल, मग मी त्याला ठार करतो.
मध्यरात्रीनंतर शिकारी गावात धावत आला. त्याच्या अंगावरचं कातड फाटल होतं.
गावकरी : मारला ? वाघ मारला....?
शिकारी : वाघ राहुद्या, आधी हे सांगा जंगलात बैल कोणी सोडला होता?

24 September 2010

शक्कल

शेजारी शेजारी लागून साड्यांची तीन दुकाने असतात.

पहिला दुकानदार आपल्या दुकानावर पाटी लावतो – आकर्षक साडी सेल.

तिसरा दुकानदार पाटी लावतो – जबरदस्त साडी सेल.
 
मधला दुकानदार शक्कल लढवतो आणि पाटी लावतो – मुख्य प्रवेशद्वार.

शिष्टाचार

एका कार्यालयातील बॉस आपल्या हाताखालच्या कर्मचार्‍यांना प्रचंड छळत असे. त्यामुळे कर्मचारीवर्ग फार कंटाळला होता.

एक कर्मचारी सेवानिवृत्त झाला. तो शिष्टाचार म्हणून बॉसचा निरोप घ्यायला गेला.

बॉस : मी मेल्याची बातमी जर तुला कळली, तर तू माझ्या प्रेतावर नक्कीच थुंकशील.
 
कर्मचारी : माझ्याकडे रांगेत उभे राहायला वेळ नाहीये.

प्रामाणिकपणाच बक्षीस

मला तुमच्या खुर्चीखाली २ रुपये सापडले, हे घ्या. असे म्हणून कर्मचार्‍याने साहेबांस ते पैसे दिले. 

साहेबांना त्याच्या प्रामाणिकपणाच कौतुक वाटल.

साहेब : राहू देत तुला, बक्षीस म्हणून.

काही दिवसांनी साहेबांचे ५०० रुपये हरवले.

साहेब : अरे, तुला माझे ५०० शे रुपये सापडले का ?
 
कर्मचारी : हो साहेब, पण मी ते बक्षीस म्हणून खर्चून टाकले.

गुटखा

साहेब : येथे गुटखा खाऊन कोण थुंकल ?
(कर्मचारी गप्प. तोंडात गुटखा)

साहेब : तू गप्प काबोल ना...
 
कर्मचारी : (तेथेच थुंकून) साहेब, या अगोदर मी येथे थुंकलो नाही.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...