पेशंट : डॉक्टर तुम्ही फुलांचा हार घेऊन का आलात?
डॉक्टर : आज माझे पहिले ऑपरेशन आहे. यशस्वी झाले तर माझा सत्कार व्हावा म्हणून आणि नाही यशस्वी झाले तर तुमच्या उपयोगी पडेल.
Now we are on YouTube!!!
Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
28 January 2011
प्रॉब्लेम
बायको : अहो डॉक्टर, माझे पती रात्रीचे झोपेत असताना बोलत असतात.
डॉक्टर : मग तुम्ही त्यांना दिवसा बोलण्याची संधी देत जा.
डॉक्टर : मग तुम्ही त्यांना दिवसा बोलण्याची संधी देत जा.
संताचं ज्ञान
बॉस : अरे संता, तुला MS OFFICE माहीत आहे का?
संता : सरजी, पत्ता दिला तर मी शोधून काढीन.
संता : सरजी, पत्ता दिला तर मी शोधून काढीन.
बंड्याचा प्रश्न
बंड्या : पप्पा, तुम्ही इंजिनीयर कसे काय झालात?
पप्पा : अरे, त्यासाठी डोकं लागतं.
बंड्या : अहो, म्हणूनच तर मला प्रश्न पडलाय की तुम्ही इंजिनीयर कसे काय झालात.
पप्पा : अरे, त्यासाठी डोकं लागतं.
बंड्या : अहो, म्हणूनच तर मला प्रश्न पडलाय की तुम्ही इंजिनीयर कसे काय झालात.
बक्षीस
बंड्या : पप्पा, पप्पा, मी परीक्षेत पास झालो तर मला तुम्ही काय देणार?
पप्पा : मी तुला १ सायकल देईन.
बंड्या : आणि पास नाही झालो तर?
पप्पा : मग मी तुला १० सायकली देईन.
बंड्या : (आनंदाने) १०? का?
पप्पा : हो, १०. तुला मी शाळेतून घरी बसवीन आणि सायकलचं दुकान टाकून देईन.
पप्पा : मी तुला १ सायकल देईन.
बंड्या : आणि पास नाही झालो तर?
पप्पा : मग मी तुला १० सायकली देईन.
बंड्या : (आनंदाने) १०? का?
पप्पा : हो, १०. तुला मी शाळेतून घरी बसवीन आणि सायकलचं दुकान टाकून देईन.
मोबाइलचं चेकअप
संता आपला मोबाइल घेऊन डॉक्टरकडे जातो.
का माहितीये?
त्याला त्याच्या मोबाईलमध्ये ब्लुटुथ आहे की नाही ते चेक करायचं असतं म्हणून.
का माहितीये?
त्याला त्याच्या मोबाईलमध्ये ब्लुटुथ आहे की नाही ते चेक करायचं असतं म्हणून.
बायकोचा राग
संता : अरे, तुझी बायको सारखी रागावलेली का असते?
बंता : काय सांगायचं, एकदा प्रेमाने मी तिला चुकून बोलून गेलो की तू रागावल्यावर फारच सुंदर दिसतेस म्हणून.
बंता : काय सांगायचं, एकदा प्रेमाने मी तिला चुकून बोलून गेलो की तू रागावल्यावर फारच सुंदर दिसतेस म्हणून.
अमेरिकेचा शोध
शिक्षक : बंड्या, नकाशामध्ये अमेरिका कुठे आहे ते दाखव पाहू.
बंड्या : हे बघा सर.
शिक्षक : अगदी बरोबर. मुलांनो आता मला सांगा पाहू, अमेरिकेचा शोध कुणी लावला?
मुले : बंड्याने.
बंड्या : हे बघा सर.
शिक्षक : अगदी बरोबर. मुलांनो आता मला सांगा पाहू, अमेरिकेचा शोध कुणी लावला?
मुले : बंड्याने.
27 January 2011
बंड्याचा निबंध
बंड्याला शिक्षकांनी चार पानी निबंध लिहायला सांगितला.
विषय होता - आळस म्हणजे काय ?
बंड्याही भलताच हुशार.
त्याने तीन पाने कोरी ठेवली.
शेवटच्या चौथ्या पानावर सगळ्यात खाली तीनच शब्द लिहिले.
"यालाच म्हणतात आळस."
विषय होता - आळस म्हणजे काय ?
बंड्याही भलताच हुशार.
त्याने तीन पाने कोरी ठेवली.
शेवटच्या चौथ्या पानावर सगळ्यात खाली तीनच शब्द लिहिले.
"यालाच म्हणतात आळस."
व्यवसाय
संताने ऊसाच्या रसाचं गुराळ सुरू केलं.
पहिल्याच दिवशी त्याच्याकडे एक विक्रेता बर्फाची भली मोठी लादी घेऊन आला.
संता त्या बर्फाच्या लादीकडे टक लावून पाहू लागला.
त्याच्या बायकोने त्याला विचारले, "अहो, असं काय बघताय त्या बर्फाच्या लादीकडे?"
संता : मी बराच वेळ पाहतोय, बर्फ कुठून लिक होतोय, कळतच नाहीये.

मोठं कोण?
एकदा संताला एक साधू भेटतो.
साधू विचारतो, "अरे बालका, मला सांग अक्कल मोठी की म्हैस?"
संता : साधू महाराज, आधी मला दोन्हींची जन्मतारीख सांगा.
साधू विचारतो, "अरे बालका, मला सांग अक्कल मोठी की म्हैस?"
संता : साधू महाराज, आधी मला दोन्हींची जन्मतारीख सांगा.
नोकराची रोटी
मालक : अरे रामु, तू आज रोटीला एवढं तूप का लावलंयस?
रामु : माफ करा साहेब, मी चुकून तुम्हाला माझी रोटी दिली जेवणात.
रामु : माफ करा साहेब, मी चुकून तुम्हाला माझी रोटी दिली जेवणात.
26 January 2011
निराश सरदारजी
सरदारजीचा पुत्तर : फादर, मी जर यावर्षीपण नापास झालो तर मी आत्महत्याच करीन.
बाप : खबरदार असं केलं तर, नाहीतर मी तुझा गळा दाबून जीव घेईन.
बाप : खबरदार असं केलं तर, नाहीतर मी तुझा गळा दाबून जीव घेईन.
सरदारजीचा सत्कृत्य
एक सरदारजी आपल्या आयुष्याला खूप वैतागला होता.
तो वैतागून जीव द्यायला विहिरीत उडी मारतो.
उडी मारतो आणि त्याचवेळी त्याच्या हाताला एक छोटा मासा लागतो.
तो त्या माशाला खडकावर टाकत म्हणतो, "मी तर मरायलाच आलो आहे पण तू जा,कमीत कमी तू तरी तुझा जीव वाचव."
तो वैतागून जीव द्यायला विहिरीत उडी मारतो.
उडी मारतो आणि त्याचवेळी त्याच्या हाताला एक छोटा मासा लागतो.
तो त्या माशाला खडकावर टाकत म्हणतो, "मी तर मरायलाच आलो आहे पण तू जा,कमीत कमी तू तरी तुझा जीव वाचव."
कर्जाची परतफेड
सावकार : अरे दगड्या, तू माझं कर्ज अजून परत केलं नाहीस. तुला जर कर्ज फेडता येत नसेल, तर आपण आपल्या दोघांत समझोता करूया. चालेल?
दगड्या : बोला सावकार...
सावकार : हे बघ, मी कर्जाचे अर्धे पैसे विसरून जातो.
दगड्या : ठीक आहे सावकार, मीसुद्धा राहिलेले अर्धे पैसे विसरून जातो.
दगड्या : बोला सावकार...
सावकार : हे बघ, मी कर्जाचे अर्धे पैसे विसरून जातो.
दगड्या : ठीक आहे सावकार, मीसुद्धा राहिलेले अर्धे पैसे विसरून जातो.
25 January 2011
घरचा अभ्यास
बंड्या : सर, मी न केलेल्या कामासाठी तुम्ही मला शिक्षा द्याल का?
सर : नाही बंड्या, बिलकुल नाही.
बंड्या : सर मी आजचा घरचा अभ्यास केलेला नाहीय.
सर : नाही बंड्या, बिलकुल नाही.
बंड्या : सर मी आजचा घरचा अभ्यास केलेला नाहीय.
भावाचं प्रेम
शिक्षक : जर मी रस्त्याने जात आहे आणि मला तेवढ्यात एक व्यक्ती एका गाढवाला मारत असलेली दिसली. मी त्या व्यक्तीला थांबविले, तर मी कोणत्या भावनेचं दर्शन घडवतो आहे?
बंड्या : बंधुप्रेम
बंड्या : बंधुप्रेम
23 January 2011
प्रश्न सरांचा, उत्तर मुलांचे
शिक्षक : मुलांनो, सांगा बरं गांधीजींनी कठोर परिश्रम, मेहनत करून १५ ऑगस्टला आपल्याला काय मिळवून दिले?
बंड्या : सुट्टी.
बंड्या : सुट्टी.
धोका
हॉस्टेलमध्ये राहणारा इंजिंनियरिंगचा विद्यार्थी आपल्या मित्रास विचारतो, "का रे, काय झालं? आज खूप नाराज आहेस."
मित्र : अरे काय सांगायचं. माझ्यासोबत खूप मोठा धोका झाला.
पहिला मित्र : धोका? कसा काय?
दूसरा मित्र : मी घरच्यांना सांगितलं की मला पुस्तके विकत घेण्यासाठी पैसे हवे आहेत. तर त्यांनी चक्क पुस्तकेच पाठवून दिली.
डब्यात साप

पुणे रेल्वे स्टेशनवर एक तरुण सोलापूरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढला.
ज्या डब्यात तो चढला, त्या डब्यात खूप गर्दी होती. म्हणून याने शक्कल लढवली. मोठ्या-मोठयाने तो साप साप म्हणून ओरडू लागला.
डब्यातले सगळे लोक भीतीने खाली उतरले. हा मात्र मोठ्या रुबाबात डब्यातल्या एका सीटवर जाऊन तोंडावर पेपर ठेवून झोपी गेला.
जवळपास दीड-दोन तासाने त्याला जाग आली.
तसा तो उठला आणि शेजारी उभ्या असलेल्या माणसाला त्याने विचारलं, "कोणतं स्टेशन आलं हो ?"
माणूस म्हणाला, "पुणे स्टेशन."
"काय? पुणे स्टेशन?", तो तरुण गोधळून म्हणाला.
"होय, या डब्यात साप होता म्हणून गाडी हा डबा इथेच सोडून सोलापूरला गेली," तो माणूस म्हणाला.
बंड्याचं ज्ञान
शिक्षक : बंड्या, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. योगायोग म्हणजे काय, त्याचं एक उदाहरण दे पाहू.
बंड्या : सर, योगायोग म्हणजे माझ्या वडिलांचं माझ्या आईशी एकाच वेळी, एकाच ठिकाणी लग्न झालं.
बंड्या : सर, योगायोग म्हणजे माझ्या वडिलांचं माझ्या आईशी एकाच वेळी, एकाच ठिकाणी लग्न झालं.
22 January 2011
वा, काय काळपरिवर्तन आहे...
शिक्षिका वर्गात मुलांना काळपरिवर्तनाचं उदाहरण देते.
"मी सुंदर होते, आहे आणि राहील."
आता मला तुम्हीही असंच एक उदाहरण सांगा की ज्यात भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ असेल - शिक्षिका
बंड्या : हा तुमचा गैरसमज होता, आहे आणि राहील.
21 January 2011
बुद्धिवान? हे भगवान...
संताने इंजिंनियरिंगला प्रवेश घेतला.
तेव्हा तो कॉलेजला जाताना गाढवावर बसून जात असे.
शेवटच्या वर्षी तो नापास झाला आणि मग तो पायीच कॉलेजला जाऊ लागला.
का?
सांगा पाहू...
विचार करा,
अजून थोडा विचार करा,
कारण,
गाढवाचं ग्रज्युएशन पूर्ण झालं म्हणून.
तेव्हा तो कॉलेजला जाताना गाढवावर बसून जात असे.
शेवटच्या वर्षी तो नापास झाला आणि मग तो पायीच कॉलेजला जाऊ लागला.
का?
सांगा पाहू...
विचार करा,
अजून थोडा विचार करा,
कारण,
गाढवाचं ग्रज्युएशन पूर्ण झालं म्हणून.
ABCD...
प्रेमिका : जानु, A,B,C,D,E,F,G,H म्हणजे काय रे?
मजनू : म्हणजे A Boy Can Do Everything For Girls Heart.
मजनू : म्हणजे A Boy Can Do Everything For Girls Heart.
20 January 2011
इंजिनियरिंग म्हणजे पिक्चर?
इंजिनियरिंग म्हणजे बॉलीवुड चित्रपटच आहेत की काय?
आता हिन्दी चित्रपटांची नावं आणि इंजिनियरिंगचा किती जवळचा संबंध आहे बघा ना...
परीक्षा – सोचा न था
तास – कभी कभी
प्रश्नपत्रिका – ना तुम जानो ना हम
कॉपी करणे म्हणजे – याराना
M-I - मिशन इम्पॉसिबल
M-III – असंभव
SD-III – प्यार में कभी कभी
पहिलं सेमिस्टर – कुछ तो है
शेवटचं सेमिस्टर – ये क्या हो रहा है
डिस्टिंक्शन – कल हो ना हो
फर्स्ट क्लास – राजू बन गया जेंटलमन
सेकंड क्लास – दिल मांगे मोअर
नापास – फिर मिलेंगे

19 January 2011
पगारवाढ
एक कर्मचारी आपला बॉस पगार वाढवत नसल्याने खूपच वैतागला होता.
वेगवेगळ्या युक्त्या वापरुन पहिल्या, पण काहीच उपयोग झाला नाही.
शेवटी तो बॉसला म्हणाला, "हे पहा साहेब, आता जर तुम्ही माझा पगार वाढवला नाहीत तर मी ऑफिसातल्या सगळ्या लोकांना सांगीन की तुम्ही माझा पगार वाढवलात म्हणून."

मूर्ख
एकदा वर्तमानपत्रात बातमी छापून आली.
"५०% मुली मूर्ख असतात."
ही बातमी ऐकून मुली भडकल्या, त्यांनी त्या वर्तमानपत्राच्या कार्यालयावर मोर्चा काढला.
दुसर्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी छापून आली.
"५०% मुली मूर्ख नसतात." तेव्हा कुठे मुली शांत झाल्या.
स्लोगन
लालूप्रसादांच्या बिहारमध्ये कुटुंबनियोजन नावाचा कायदाच नाही.
परंतु एक चांगला नारा मात्र आहे.
हम दो, हमारे दो
बाकी जितने भी हो,
सबको मुंबई भेज दो ।
18 January 2011
कंजूषी म्हणजे काय आजच्या जमान्यात...
एक मारवाडी कार घ्यायचं ठरवतो.
सगळ्यात स्वस्त कार कोणती बरं? असा विचार करतो आणि नॅनो घ्यायचं ठरवतो.
पण
तीही सेकंड हँड...
17 January 2011
सिनेमा
एक सरदार आपल्या मित्रांसोबत सिनेमाला जातो.
थिएटरमध्ये “ज्यूरासिक पार्क” हा सिनेमा लागलेला असतो.
सिनेमा चालू होतो. अचानक पडद्यावर दिसतं की समोरून डायनोसोर येत आहे.
सरदारजी पटकन सीटखाली लपतो.
त्याचा मित्र त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करतो, पण सरदारजी काही ऐकत नाही.
मित्र म्हणतो, “अरे कशाला घाबरतोस? सिनेमा चालू आहे.”
सरदारजी : हो, जशी काही मला अक्कलच नाही. अरे, मला माहितीये की सिनेमा चालू आहे, पण त्या जनावराला थोडंच माहितीये?
हुकमाचा बादशहा
दोन नवर्यांचा हा संवाद.
पहिला दुसर्याला : अरे, माझ्या घरात माझी बायको माझं ऐकते. मी नुसता हुकूम करतो, "गरम पाणी घेऊन ये." की लगेच ती घेऊन येते.
दूसरा : अरे पण गरम पाणी कशाला?
पहिला : कारण, गरम पाण्यानेच तर भांडी चांगली धुवून निघतात.
16 January 2011
सरदारजीचं इम्प्रेशन
एक सरदारजी आपलं स्वत:चं ऑफिस टाकून व्यवसाय सुरू करतो.
दुपारची ३ वाजताची वेळ.
एक व्यक्ती ऑफिसात येते.
सरदारजी त्या व्यक्तीला पाहून खुश होतो. त्या व्यक्तीला सोफ्यावर बसायला सांगून स्वत: मात्र फोन उचलून १०-१५ मिनिटे बोलत बसतो.
नंतर बाहेर येऊन मग त्या व्यक्तीला एकदम नम्र शब्दांत विचारतो, “सांगा, काय सेवा करू मी आपली?”
ती व्यक्ती : मी तुमचा फोन दुरुस्त करायला आलोय.मुलींचे प्रकार
Hard Disk Girls:
She remembers everything, FOREVER.RAM Girls:
She forgets about you, the moment you turn her off.Windows Girls:
Everyone knows that she can't do a thing right, but no one can live without her.Screensaver Girls:
She is good for nothing but at least she is fun!Internet Girls:
Difficult to access.Server Girls:
Always busy when you need her.Multimedia Girls:
She makes horrible things look beautiful.CD-ROM Girls:
She is always faster and faster.Email Girls:
Every ten things she says, eight are nonsense.Virus Girls:
Also known as "WIFE"; when you are not expecting her, she comes, installs herself and uses all your resources. If you try to uninstall her you will lose something, if you don't try to uninstall her you will lose everything.Received by mail (unknown).
15 January 2011
युक्ती
एक दिवस आटपाट नगराचे सगळे लोक एकत्र येतात.
सरदारजी त्यांचा म्होरक्या असतो.
सरदारजीला ते विनंती करतात, की काहीही करून या गुंडाला गावातून हाकलून लावायचं आहे. काहीतरी मार्ग सांगा.
सरदारजी : त्यात काय एवढं? त्याला निवडणुकीला उभं करा. आमदार झाला की पुढची ५ वर्षं तो गावामध्ये फिरकणारसुद्धा नाही.

14 January 2011
सरदारजीची मुलाखत भाग-२
सरदारजीची मुलाखत चालू असते.
प्रश्न : तुम्ही मला सांगू शकता का, गांधीजींची हत्या कोणी केली?
सरदारजी : धन्यवाद सर मला नोकरी दिल्याबद्दल. मी आजपासूनच तपासाला सुरुवात करतो.
समझदार
पेशंट : डॉक्टरसाहेब, अहो काय करू खूप जीवावर आलंय बघा आता. माझं सारखं सारखं तोंड येतं.
डॉक्टर : येणारच, रोज रोज हॉटेलमध्ये जेवण करताना...
पेशंट : ठीक आहे मग. उद्यापासून मी घरी जाताना पार्सल घेऊन जात जाईन.
डॉक्टर : येणारच, रोज रोज हॉटेलमध्ये जेवण करताना...
पेशंट : ठीक आहे मग. उद्यापासून मी घरी जाताना पार्सल घेऊन जात जाईन.
13 January 2011
सरदारजीची मुलाखत भाग-१
मुलाखतीत प्रश्न विचारलं जातो, "इलेक्ट्रिक मोटर कशी चालू होते?"
सरदारजी : ढुर्र, ढुर्र, ढुर्र...............
मुलाखतकार : (ओरडून) थांबवा आधी ते.
सरदारजी : ढुर्र, ढुप, ढुप, ढुप.......
सरदारजी : ढुर्र, ढुर्र, ढुर्र...............
मुलाखतकार : (ओरडून) थांबवा आधी ते.
सरदारजी : ढुर्र, ढुप, ढुप, ढुप.......
अरे हो...
नर्स : काय झालं डॉक्टर, असे उदास का बसलात?
डॉक्टर : मी मघाशी ज्याचं ऑपरेशन केलं त्याचा मृत्यू झाला.
नर्स : अहो, मग त्यात असं उदास व्हायचं काय कारण? ते तर शवविच्छेदन होतं.
डॉक्टर : अरे बापरे, मग मी सकाळी कुणाचं शवविच्छेदन केलं?
डॉक्टर : मी मघाशी ज्याचं ऑपरेशन केलं त्याचा मृत्यू झाला.
नर्स : अहो, मग त्यात असं उदास व्हायचं काय कारण? ते तर शवविच्छेदन होतं.
डॉक्टर : अरे बापरे, मग मी सकाळी कुणाचं शवविच्छेदन केलं?
12 January 2011
हॉट कॉफी
सरदार त्याच्या बायकोला घेऊन कॉफी हाऊसमध्ये जातो.
दोघेजण गरमागरम कॉफी घेतात.
सरदार पटकन कॉफी पिऊन टाकतो.
त्याच्या बायकोलाही तो कॉफी पटकन पिऊन टाकायला लावतो.
त्याची बायको त्याला याचं कारण विचारते.
तर सरदारजी म्हणतो, "कारण तिथं बोर्ड लावलाय, हॉट कॉफी ५ रुपये आणि कोल्ड कॉफी १० रुपये."

बोटांचे ठसे
पोलीस इन्स्पेक्टर : हवालदार रेडे, तुम्ही चोर पकडला का?
हवालदार : नाही साहेब, पण त्याची निशाणी मिळाली.
इन्स्पेक्टर : काय ती?
हवालदार : त्याच्या बोटांचे ठसे.
इन्स्पेक्टर : कुठे?
हवालदार : माझ्या गालांवर.
हवालदार : नाही साहेब, पण त्याची निशाणी मिळाली.
इन्स्पेक्टर : काय ती?
हवालदार : त्याच्या बोटांचे ठसे.
इन्स्पेक्टर : कुठे?
हवालदार : माझ्या गालांवर.
11 January 2011
सरदारजीचा रेल्वे प्रवास
सरदार एकदा रेल्वे प्लॅटफॉर्मवर जातो. तेवढ्यात तिथे सूचना ऐकू येते.
"मुंबई-पुणे एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर १ वर थोड्याच वेळात येत आहे."
ही सूचना ऐकून प्लॅटफॉर्म नंबर १ वर उभा असलेला सरदार रेल्वे रुळावर उडी मारतो.
प्लॅटफॉर्मवर थांबलेले सगळे प्रवासी त्याला वर ओढू लागतात. त्याचे मित्र त्याला विचारतात, "का रे, रुळावर उडी का मारलीस?"
सरदार : तुम्ही ऐकलं नाही का, गाडी रुळावर नाही, प्लॅटफॉर्मवर येते आहे.

निरोप
एक दिवस राजा आणि राणी ठरवतात की दोघांनी एकमेकांना काहीही निरोप द्यायचा झाल्यास त्यासाठी मोबाईल किंवा फोन वापरायचा नाही, तर जुन्या काळात जसा कबुतराचा वापर केला जायचा तसा आपणही करायचा.
मग राणी एक कबुतर त्याच्या गळ्यात निरोपाची चिठ्ठी न अडकवताच राजाकडे पाठवून देते.
राजा मात्र निरोपाच्या चिठ्ठीशिवाय नुसतं कबुतर बघून चांगलाच वैतागतो. लगेच फोन करून राणीला याचं कारण विचारतो.
तर राणी म्हणते, "अरे एवढं कसं कळत नाही तुला, तो तर मिस्ड कॉल होता."

खरेदी - विक्री
पहिला वेडा : मी ताजमहाल विकत घेणार आहे.
दूसरा वेडा : अरे, पण मी तो इतक्यात विकणार नाहीये.
दूसरा वेडा : अरे, पण मी तो इतक्यात विकणार नाहीये.
09 January 2011
मुलांचं तिकीट
संता बसमधून प्रवास करत असतो.
संता कंडक्टरला विचारतो, "काय हो, लहान मुलांचंही तिकीट काढाव लागेल का?"
कंडक्टर : हो, जर ८ च्यावर असल्यास काढाव लागेल.
संता : अरे देवा बरं झालं, मला ६ च मुले आहेत ते.
संता कंडक्टरला विचारतो, "काय हो, लहान मुलांचंही तिकीट काढाव लागेल का?"
कंडक्टर : हो, जर ८ च्यावर असल्यास काढाव लागेल.
संता : अरे देवा बरं झालं, मला ६ च मुले आहेत ते.
07 January 2011
पायलट सरदारजी
सरदारजीला एका विमान कंपनीत पायलटची नोकरी लागते.
तो आपलं पहिलं-वहिलं उड्डाण करतो.
थोड्याच वेळात विमान पडल्याची बातमी येते.
सरदारजी मात्र वाचतो.
त्याची चौकशी केली जाते. तर तो घडलेली हकीकत सांगतो.
"अहो, वर गेल्यावर खूपच थंड वाटायला लागलं म्हणून मग मी पंखा (फॅन) बंद केला इतकंच."

06 January 2011
नोकरीचा अर्ज
सरदारजीला एका कंपनीत नोकरीचा अर्ज भरत होता.
अर्ज भरताना एका कॉलममध्ये त्याला थोडीशी माहिती भरायची होती.
एका ठिकाणी लिहिले होते, पगाराची अपेक्षा.
सरदारजीला काहीच सुचेना काय लिहावे त्यासमोर.
बराच विचार करून मग त्याने लिहिले, "होय."
अर्ज भरताना एका कॉलममध्ये त्याला थोडीशी माहिती भरायची होती.
एका ठिकाणी लिहिले होते, पगाराची अपेक्षा.
सरदारजीला काहीच सुचेना काय लिहावे त्यासमोर.
बराच विचार करून मग त्याने लिहिले, "होय."
04 January 2011
Diploma Boys
इंजिनियरिंग कॉलेजमध्ये एका व्यावसायिक शाखेत एका वर्षाला एकूण विद्यार्थी असतात ७०.
त्यातले ६० विद्यार्थी असतात, १२वी विज्ञान शाखेतून शिकलेले.
तर पदविका (डिप्लोमा) करून आलेले फक्त १० च ?.
असं का बरं?
कारण,
मुलं जास्त असू शकतात,
पण
"बाप" तर कमीच असणार ना !!!
त्यातले ६० विद्यार्थी असतात, १२वी विज्ञान शाखेतून शिकलेले.
तर पदविका (डिप्लोमा) करून आलेले फक्त १० च ?.
असं का बरं?
कारण,
मुलं जास्त असू शकतात,
पण
"बाप" तर कमीच असणार ना !!!
03 January 2011
आयटी इंजिनियर आणि भिकारी
आयटी इंजिनियर आणि भिकारी या दोघांचा व्यवसाय / नोकरी तशी वेगळी.
पण तरीही त्यांच्यात एक साम्य आहे.
जेव्हा दोन आयटी इंजिनियर आणि दोन भिकारी एकमेकांना भेटतात, तेव्हा ते एकमेकांना विचारतात.
"तू सध्या कोणत्या "प्लॅटफॉर्म"वर काम करतो आहेस?"
पण तरीही त्यांच्यात एक साम्य आहे.
जेव्हा दोन आयटी इंजिनियर आणि दोन भिकारी एकमेकांना भेटतात, तेव्हा ते एकमेकांना विचारतात.
"तू सध्या कोणत्या "प्लॅटफॉर्म"वर काम करतो आहेस?"
01 January 2011
Life of Accountant
What comes I debited,
What goes I credited,
Birth is my opening stock,
Ideas are my Assets and
Views are my liabilities,
Happiness is my profit and
Sorrow is my loss,
Duties are my out standing expenses,
And working is my prepaid expenses,
Bad things I always depreciate,
And all good things I always appreciate,
Friendship is my hidden adjustment,
My character is my capital,
Knowledge is investment,
Good will is my wealth,
And my aim is totally the balance,
In the end death is my closing stock.
Subscribe to:
Posts (Atom)
मराठी म्हणींचा शोध
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...